फेसबुकवरून चोरलेला डेटा काँग्रेसनं गुजरात निवडणुकीत वापरला-रविशंकर प्रसाद

केम्ब्रिज अॅनालिटिका या दोषी कंपनीचा डेटा काँग्रेसनं गुजरात निवडणुकीत वापरला असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2018 01:54 PM IST

फेसबुकवरून चोरलेला डेटा काँग्रेसनं गुजरात निवडणुकीत वापरला-रविशंकर प्रसाद

22 मार्च : फेसबुकचं डेटा चोरीचं प्रकरण सध्या खूप गाजतंय. केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत फेसबुकवरच्या डेटाच्या मदतीनं डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केल्याचं समोर आलंय. अमेरिकेपासून सुरू झालेलं हे वादळ आता भारतापर्यंत येऊन पोहोचलंय. केम्ब्रिज अॅनालिटिका

या दोषी कंपनीचा डेटा काँग्रेसनं गुजरात निवडणुकीत वापरला असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला.

फेसबुक युजर्सच्या डेटाचा गैरवापर काही खासगी कंपन्यांनी केला, यावरून जगभरात गदारोळ सुरू आहे. यावर अखेर मार्क झकरबर्गनं मौन सोडलंय. होय, डेटा हाताळण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या, आम्ही तो हवा तितका सुरक्षित ठेवू शकलो नाही.. याची सखोल चौकशी करू आणि पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेऊ, असं मार्कनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

काय आहे प्रकरण?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना कॅम्ब्रिज अॅनालिटिका' कंपनीची मदत

Loading...

कंपनीवर 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरल्याचा आरोप

चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापर केल्याचा आरोप

फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

फेसबुकच्या शेअर्सची जवळपास 5.2 टक्क्यांनी घसरण

फेसबुकच्या मार्केट कॅपिटलमध्ये जवळपास 32 अब्ज डॉलरची घसरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2018 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...