जबलपूर, 23 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आज पार पडला. उरलेल्या मतदारसंघांसाठीचा प्रचार टिपेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसून वैयक्तिक टीकाही केली जात आहे. राहुल गांधींची मध्य प्रदेशातली सभा हे त्याचं उदाहरण म्हणता येईल.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मध्य प्रदेशात जबलपूर इथे सभा झाली. तेव्हा त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांवर जोरदार टीका केली. अमित शहांवर खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. ते या गुन्ह्यातले प्रमुख आरोपी आहेत, असं सांगत त्यांनी अमित शहांचा मुलगा जय यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले.
"जय शहा हे नाव ऐकलंय तुम्ही? ते जादुगार आहेत..." असं म्हणत राहुल गांधींनी अमित शहांच्या मुलाचं नाव घेतलं. "तो जादुगार आहे. 50,000 रुपयांचे 3 महिन्यात 80 कोटी रुपये केलेत त्यांनी." असं राहुल म्हणाले. त्यापूर्वी अमित शहांवर शरसंधान करताना ते म्हणाले, "मर्डर अक्युज्ड अमित शहा... वा! क्या शान है!"
#WATCH Congress President Rahul Gandhi in Jabalpur, Madhya Pradesh says, "Murder accused BJP President Amit Shah....waah! kya shaan hai....Have you heard Jay Shah's name? He is a magician, he made Rs 50,000 into Rs 80 crore in 3 months." pic.twitter.com/lja1k5w0Sk
— ANI (@ANI) April 23, 2019
काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. लोकसभा मतदानाच्या एकूण 7 पैकी 3 टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. निम्म्या देशाने आपलं मत नोंदवलं आहे आणि निम्मा देश पुढच्या काही दिवसात आपला नेता निवडणार आहे.
VIDEO : मनसेसैनिकांचा नवा लूक, 'लाव रे तो व्हिडिओ'