S M L

'नमो अॅप'वरून भारतीयांची खाजगी माहिती उघड केली जातेय - राहुल गांधी

राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. ''मी नरेंद्र मोदी, तुमचा सर्व डेटा अमेरिकी कंपनीतील माझ्या मित्रांना देत आहे,'' असं उपरोधिक ट्विट राहुल यांनी केलं आहे.

Sonali Deshpande | Updated On: Mar 25, 2018 03:28 PM IST

'नमो अॅप'वरून भारतीयांची खाजगी माहिती उघड केली जातेय - राहुल गांधी

25 मार्च : फेसबुक डेटा लीकवरून देशातील राजकीय वातावरण तापलं असतानाच, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नमो अॅप'वरून मोठं वादंग निर्माण झालंय. या अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खाजगी माहिती उघड केली जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. सोशल मीडियावर #DeleteNaMoApp मोहीमही राबवण्यात येतीये.

आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. ''मी नरेंद्र मोदी, तुमचा सर्व डेटा अमेरिकी कंपनीतील माझ्या मित्रांना देत आहे,'' असं उपरोधिक ट्विट राहुल यांनी केलं आहे.

दरम्यान, नमो अॅपचा वापर करणाऱ्या लोकांची खासगी माहिती त्यांच्या परवानगीशिवाय अमेरिकी कंपन्यांना दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेसने याच मुद्द्यावरून मोदी आणि भाजपला घेरलं आहे. नरेंद्र मोदी अॅपवर प्रोफाइल तयार करणाऱ्यांची खासगी माहिती 'क्लेवर टॅप' नावाच्या अमेरिकी कंपनीला पाठवली जाते, असा दावा करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2018 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close