मोदीजी, 100 दिवसांमध्ये देश तुमच्या तावडीतून मुक्त होईल - राहुल गांधी

मोदीजी, 100 दिवसांमध्ये देश तुमच्या तावडीतून मुक्त होईल - राहुल गांधी

'युवक, शेतकरी, दलित, आदीवासी, व्यापारी अल्पसंख्याक हे सगळे तुमच्यापासून त्रस्त आहेत.'

  • Share this:

नवी दिल्ली 20 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडत नाहीत. ट्विटरच्या माध्यमातून ते मोदींवर टीकेचे प्रहार करत असतात. शनिवारी कोलकत्यात झालेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात फक्त वाचवा, वाचवा, वाचवा असा सूर ऐकू येत होता अशी टीका मोदींनी केली होती. त्याला राहुल गांधी यांनी उत्तर दिलंय.

राहुल गांधी म्हणाले, " महोदय, हा प्रश्न हा लाखो भारतीयांचा आहे. युवक, शेतकरी, दलित, आदीवासी, व्यापारी अल्पसंख्याक हे सगळे तुमच्यापासून त्रस्त आहेत आणि तुमच्यापासून त्यांना सुटका करून घ्यायची आहे. तुमच्या राजवटीपासून मुक्त होण्यासाठी ते याचना करत आहेत." पुढच्या 100 दिवसांमध्ये ते सर्व तुमच्या जाचातून मुक्त होतील अशी टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाले होते मोदी?

विरोधकांच्या महाआघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले, "ही आघाडी नामदारांची आघाडी आहे. जाती-पातीचं राजकारण,भ्रष्टाचार, घोटाळे, घराणेशाही, अस्थिरता याचा अद्भूत संगम म्हणजे ही महाआघाडी आहे."

शनिवारी कोलकत्यात झालेल्या विरोधकांच्या रॅलीत देशभरातले सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते.

त्या सर्वच नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना टार्गेट केलं होतं. यावर पंतप्रधानांनी शनिवारीच टीकाही केली होती. या रॅलीतून फक्त वाचवा, वाचवा असे सूर येत होते अशी टोकी मोदींनी केली होती. आम्ही गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद यांना हटवण्याच्या मागे आहोत आणि विरोधकांना फक्त मोदींना हटवायचं आहे अशी टीकाही त्यांनी केली होती.

VIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं

First published: January 20, 2019, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading