नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Case) मधील कथित गँगरेपनंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या प्रवेशावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी (Smriti Irani) यांनाही टिप्पणी केली आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी पुन्हा हाथरस येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले. काँग्रेस नेत्यांच्या या दौऱ्यावर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी हे हाथरसमधील पीडित कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकारण करण्यासाठी जात आहेत, असा पलटवार स्मृती इराणींनी केला आहे. लोकांना काँग्रेसच्या रणनीतीविषयी माहिती आहे, म्हणून 2019 मध्ये जनतेने भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वाराणसीत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल गांधी हे नेहमीच राजकारण करण्यासाठी अग्रेसर असतात, मात्र राष्ट्रनीतीमध्ये नरेंद्र मोदी हेच यशस्वी झालेले असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. स्वतंत्र देशाने काँग्रेसचे चाल ओळखली असल्याचे मला वाटते. कोणीही नेता कोणत्याही विषयात राजकारण करू पाहत असेल तर मी त्यांना रोखणार नाही, मात्र हाथरसला भेट देणे हे केवळ राजकारण असून यात पीडितेला न्याय देण्याचा उद्देश नसल्याची टीका इराणी यांनी केली आहे.
हे ही वाचा-चीनची झोप उडणार! PM मोदींच्या हस्ते 'अटल टनेल'चं उद्घाटन, पाहा PHOTOS
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खासदारांचं एक प्रतिनिधी मंडळ आज हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. या बाबत राहुल गांधी म्हणाले की, त्यांना या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
पोलिसांनी केलेला व्यवहार स्वीकारार्ह नाही - राहुल गांधी
काँग्रेस नेता म्हणाले, त्या मुलगीसह तिच्या कुटुंबीयांसोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांकडून दिलेली वागणूक स्वीकारार्ह नाही. पार्टीचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अनेक खासदार हाथरस येथे जातील आणि शोकाकुल कुटुंबीयाची भेट घेतील.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.