लॉकडाऊननंतर राहुल गांधींचा नवा लूक व्हायरल; मात्र users ना सतावतोय हा प्रश्न

लॉकडाऊननंतर राहुल गांधींचा नवा लूक व्हायरल; मात्र users ना सतावतोय हा प्रश्न

राहुल गांधींच्या त्या लूकवरुन वापरकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जुलै : लॉकडाऊननंतर अनेक कलाकारांनी आपला नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. यादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची चर्चा सुरू आहे. तसं पाहता राहुल गांधी कायम आपल्या सोशल मीडियावरुन विविध व्हिडीओ शेअर करीत असतात.

या व्हिडीओच्या माध्यमातून ते केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांचा लूक वेगळाच दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या त्यांच्या नव्या लूकविषयी चर्चा सुरू झाली आहे.

राहुल गांधींनी शुक्रवारी ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश शेअर केला. यामध्ये त्यांचा नवा लूक पाहून लोक हैराण झाले. हाफ शर्ट आणि हलकेसे कुरळे केस पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. या व्हिडीओमध्ये ते नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक आणि विदेश योजनांवरुन निशाणा साधत होते. त्या व्हिडीओमध्ये त्यांचा लूक वेगळा (कुरळे केस, चेहऱ्यावर दाढी) दिसत होता. विशेष म्हणजे या व्हिडीओच्या एक आठवड्यापूर्वी त्यांनी क्लीन शेव आणि छोट्या केसांमधला एक व्हिडीओ शेअर केला होता. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या दोन व्हिडीओवरुन सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. काहींच्या मते ते जुने व्हिडीओ पुन्हा शेअर करीत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: July 20, 2020, 7:01 PM IST

ताज्या बातम्या