मुंबई, 3 नोव्हेंबर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनेता (Rahul Gandhi’s letter written to Shah Rukh Khan revealed) शाहरूख खानला लिहिलेलं पत्र उघड झालं आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानचा (Letter written during Aryan Khan in jail) मुलगा आर्यन खान तुरुंगात असताना हे पत्र लिहिण्यात आलं होतं. आर्यन खानच्या अटक प्रकरणावरून महाराष्ट्रातील (State vs center in Aryan Khan case) राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष भाजप आणि एनसीबीवर टीका करत असतानाच राहुल गांधी यांनी हे पत्र लिहिल्याचं उघड झालं आहे.
काय आहे पत्रात?
राहुल गांधी यांनी शाहरुख खानला या पत्रातून नैतिक पाठबळ दिल्याचं दिसून आलं आहे. देश तुमच्या पाठिशी आहे, असं या पत्रात लिहिण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला जेव्हा जामीनही मिळाल नव्हता, त्या काळात लिहिलेलं हे पत्र आहे. 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर टाकलेल्या धाडीनंतर शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीनं अटक केली होती. त्यानंतर एक महिना आर्यन खानला तुरुंगात राहावं लागलं होतं.
आर्यन खानवरून राजकारण
आर्यन खान अटक प्रकरण आणि क्रूझ ड्रग प्रकरणावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष विरुद्ध एनसीबी आमनेसामने आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचं सत्र सुरूच ठेवलं असून रोज नवनवे खुलासे ते करत आहेत. या काळात राहुल गांधींनी शाहरुख खानला पत्र लिहून त्याच्या पाठिशी उभं राहिल्याचं या पत्रातून दिसून आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग आला असून काँग्रेसही शाहरूख खानच्या पाठिशी उभी राहिल्याचं दिसून आलं आहे. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर आता आर्यन खान अटक प्रकरणाने वेगळे वळण घेतल्याचं चित्र दिसत असून यानिमित्त केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगल्याचं दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.