राहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप

या घटनेनंतर पंतप्रधान कार्यालयानेही फोन करून राहुल गांधी यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2018 11:35 PM IST

राहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप

कर्नाटक, 26 एप्रिल : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानाचं इमर्जंसी लँडिंग करावं लागलंय. विमानासोबत कुणी छेडछाड केल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केला.

काँग्रेसने याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. कर्नाटक पोलीस प्रमुख नीलमणी एन राजू यांच्याकडे केली तक्रारीची प्रत न्यूज18 च्या हाती लागलीये. यात राहुल गांधी दिल्लीहुन हुबळी दरम्यान दोन तासांच्या प्रवासात अनेक तांत्रिक अडचणी आल्यात. पक्षाने याबाबत चौकशीची मागणी केलीये.

या विमानात राहुल गांधी यांच्यासोबत तीन अन्य प्रवाशी होते. या घटनेनंतर पंतप्रधान कार्यालयानेही फोन करून राहुल गांधी यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 11:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...