मराठी बातम्या /बातम्या /देश /

Assembly Elections 2021:बायसेप्स, पुशअप्स, नृत्य आणि पोहणं : राहुल गांधी हे सगळं दक्षिणेतच का करतात?

Assembly Elections 2021:बायसेप्स, पुशअप्स, नृत्य आणि पोहणं : राहुल गांधी हे सगळं दक्षिणेतच का करतात?

Rahul gandhi

Rahul gandhi

Assembly elections 2021: अमेठीत (Amethi) राहुल गांधी हरले आणि ते वायनाडमधून (Waynad) जिंकून आले. याचाच अर्थ असा की, अमेठीतलं अपयश आणि वायनाडमधलं यश हा फॉर्म्युला आता संपूर्ण प्रदेशातच वापरून पाहण्याच्या रणनीतीवर राहुल गांधींचं काम सुरू आहे.

पुढे वाचा ...

अरुण सिंह

नवी दिल्ली, 4 मार्च  : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अलीकडच्या तमिळनाडू (Tamilnadu) दौऱ्यादरम्यानच्या चार छायाचित्रांवर बरीच चर्चा झाली. एका छायाचित्रात ते एका मुलीला स्वाक्षरी देता-देता मिठी मारत आहेत, दुसऱ्या छायाचित्रात ते भराभर पुशअप्स काढताना दिसत आहेत. तिसऱ्या छायाचित्रात ते समुद्रात झेप घेत आहेत आणि चौथ्या छायाचित्रात ते मंचावर थिरकताना दिसत आहेत. आता प्रश्न हा आहे,की राहुल गांधींनी कित्येक वर्षं उत्तर भारतातल्या अमेठी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. उत्तर भारतात ते अनेक दौरेही करतात; पण अशा प्रकारची छायाचित्रं घेण्याचे प्रसंग ते उत्तर भारतातल्या दौऱ्यांदरम्यान येऊ देत नाहीत.

'प्रत्येक संकटाच्यावेळी दक्षिणेकडे पाहा' या गांधी परिवाराच्या नीतीमध्ये या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. गांधी परिवाराला जेव्हा जेव्हा आव्हानांचा सामना करावा लागतो,तेव्हा तेव्हा त्यांची नजर दक्षिणेकडे वळते,याचा इतिहास साक्षीदार आहे.आणीबाणीनंतर इंदिरा गांधी (Indira Gandhi)सगळ्या बाजूंनी घेरल्या गेल्या होत्या. त्या वेळी इंदिरा गांधींचं चिकमंगळूरमधून 'एक शेरनी सौ लंगूर,चिकमंगलूर चिकमंगलूर' अशा घोषणा देणं असो, सोनिया गांधींनी बेल्लारीमधून निवडणूक लढवणं असो किंवा राहुल गांधींनी वायनाडमधून लोकसभेत येणं असो.

गेल्या दोन लोकसभा (Loksabha Elections) निवडणुकांमध्ये काँग्रेसची (Congress),खासकरून उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये,वाताहत झाल्यामुळे राहुल गांधींना दक्षिण भारतावर लक्ष केंद्रित करण्यावाचून पर्याय उरला नाही. अमेठीत(Amethi)राहुल गांधी हरले आणि ते वायनाडमधून (Waynad)जिंकून आले. याचाच अर्थ असा की अमेठीतलं अपयश आणि वायनाडमधलं यश हा फॉर्म्युला आता संपूर्ण प्रदेशातच वापरून पाहण्याच्या रणनीतीवर राहुल गांधींचं काम सुरू आहे. आता दक्षिणेतूनच काँग्रेसचं पुनरुज्जीवन करून पक्षाला सत्तेत आणण्याचं स्वप्न राहुल गांधी पाहत आहेत.

हे वाचा  -  Petrol diesel Price : पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? सरकार घेऊ शकतं हा मोठा निर्णय

राहुल गांधींनी याकरिता के. सी. वेणुगोपाल यांच्यासारख्या राष्ट्रीय राजकारणाचा तुलनेने कमी अनुभव असलेल्या नेत्याला संघटन महासचिव यासारख्या काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या असलेल्या पदावर बसवलं. अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad)राज्यसभेतून निवृत्त झाले. ती जबाबदारी राहुल गांधींनी आता कर्नाटकच्या मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याकडे सोपवली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections)आता जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी सर्वांत जास्त वेळ तमिळनाडू, केरळ आणि आसामला देणार आहेत.पश्चिम बंगालमध्ये प्रचार कधी करायचा,याच्या तारख्या त्यांनी अद्याप निश्चित केलेल्या नाहीत. काँग्रेस पक्षातल्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार,केरळ आणि तमिळनाडूतल्या निवडणुका संपल्यानंतरच राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये जातील.

राहुल गांधी जेव्हा दक्षिण भारतात दौऱ्यावर जातात,तेव्हा गांधी परिवारातले असल्यामुळे ते आकर्षणाचं केंद्र असतात. हे चित्र आता उत्तर भारतात पाहायला मिळत नाही. पूर्वी उत्तर भारतातही राहुल गांधींबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता होती. आता तो प्रभाव काळानुसार ओसरलाआहे. दक्षिण भारतातून लोकांचा जास्त पाठिंबा मिळत असल्याने खूश असलेले राहुल गांधी त्या कारणामुळे ही दक्षिणेकडे जास्त वेळा जात असतात.

अर्थात,राहुल गांधी यांची ही रणनीती जोखीमपूर्णही आहे. उत्तरेकडच्या सगळ्या रणभूमीकडे दुर्लक्ष करून दक्षिणेच्या जोरावर पक्षाला सत्ता मिळवून देण्याची वाट वाकडीही होऊ शकते. कारण,दिल्लीकडे जाणारा रस्ता उत्तर प्रदेशातूनच जातो, ही भारतीय राजकारणातली म्हण प्रसिद्ध आहे. मग,राहुल गांधी स्वतःदक्षिणेत जास्त वेळ व्यतीत करून आणि उत्तरेत प्रियांका (Priyanka Gandhi) यांच्या करिष्म्यावर हवाला ठेवून संपूर्ण भारतात पक्षाचं पुनरुज्जीवन करण्याचा प्लॅन आखत आहेत का,हा प्रश्न आहे.

First published:

Tags: Assembly session, Rahul gandhi, Tamilnadu, West bengal