Home /News /national /

हाथरस प्रकरणात राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले लज्जास्पद बाब म्हणजे...

हाथरस प्रकरणात राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले लज्जास्पद बाब म्हणजे...

'अद्यापही दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस म्हणून वागणूक दिली जात नाही'

    नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी हाथरसच्या घटनेवर उत्तर प्रदेश सरकार रविवारी पुन्हा एकदा निशाणा साधला. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या पोलिसांनी सांगितले की हाथरसमधील दलित तरुणीवर बलात्कार झालेला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि अन्य अनेक भारतीयांसाठी ती कोणीच नव्हती.' अशा शब्दात राहुल गांधी यांनी राग व्यक्त केला. हाथरस प्रकरणात एका दलित तरुणीचा कथित सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झाला. राहुल गांधी यांनी पुढे लिहिलं आहे की, लज्जास्पद म्हणजे सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस मानतच नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करीत पुन्हा एकदा हाथरसमध्ये झालेल्या घटनेवर असंतोष व्यक्त केला आहे. हाथरस येथील एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती. मात्र योगी सरकार आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांनी मुलीवर बलात्कार झाल्याचे नाकारले. मात्र या प्रकरणात मुलीने स्वत: तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले होते, अशी माहिती आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस कथित सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय दलित मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. हे ही वाचा-अंगणात वाहत होता रक्ताचा पाट; नेत्यासह कुटुंबाची गळा चिरून हत्या, परिसरात खळबळ यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा मुलीवर अंत्यसंस्कार केला. याप्रकरणात पोलिसांवर आरोप आहे की पीडित कुटुंबाची यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. यामुळे उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला जात होता. अनेकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. केंद्राने हे प्रकरण पुढील तपासासाठी सीबीआयकडे दिलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rahul gandhi, Yogi Aadityanath

    पुढील बातम्या