News18 Lokmat

राहुल गांधींनी पवारांवर विश्वास ठेवला पाहिजे,अमित शहांचा टोला

राफेल करारावर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शरद पवार सत्य बोलले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो असं शहांनी टि्वट केलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2018 08:40 PM IST

राहुल गांधींनी पवारांवर विश्वास ठेवला पाहिजे,अमित शहांचा टोला

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : राफेल करारावरून उठलेल्या वादात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केल्यामुळे एकच चर्चेला उधाण आलंय. विरोधक म्हणून पवारांच्या विधानामुळे काँग्रेस बॅकफूटवर पडली. आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवारांचे आभार मानत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा टोला लगावलाय.

अमित शहा आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, राफेल करारावर  पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शरद पवार सत्य बोलले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो असं शहांनी टि्वट केलं. ते पुढे म्हणतात, आता तरी   राहुल गांधी यांनी आपल्याचे मित्रपक्ष असलेल्या शरद पवारांवर पवारांवर विश्वास ठेवला पाहिजे. राफेल कराराबाबत मोदींवर लोकांना शंका नाही असंही अमित शहांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलंय.

शरद पवार यांनी न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी राफेल करारावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली होती.

 

तर राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौकीदार नाही तर चोर आहेत असा थेट हल्ला राहुल गांधी यांनी मोदींवर केला होता.

तरदुसरीकडे शरद पवार यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या वक्तव्यावर जास्त बोलणार नाही अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी घेतली.

शरद पवारांची संपूर्ण मुलाखत

=========================================================================

VIDEO : ड्रोनच्या नजरेतून पुण्यातील पाण्याचा हाहाकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...