Photo Viral : राहुल गांधींनी स्वतःचंच पद लिहिलं चुकीचं

Photo Viral : राहुल गांधींनी स्वतःचंच पद लिहिलं चुकीचं

राहुल गांधी यांनी राजस्थानात प्रचार दौऱ्यावर एका देवस्थानात पूजा केली. तिथल्या नोंदवहीत अभिप्रायही नोंदवला पण त्यात नेमकं स्वतःचं पदच चुकीचं लिहिल्यानं त्या नोंदीचा फोटो व्हायरल होतोय. राहुल गांधी यांनी आपलं गोत्रही या वेळी उघड केलं.

  • Share this:

अजमेर (राजस्थान), २६ नोव्हेंबर :  राहुल गांधी यांनी राजस्थानात प्रचार दौऱ्यावर एका देवस्थानात पूजा केली. तिथे त्यांनी आपल्या जातीसह गोत्राचा उल्लेख केल्याची बातमी आहे. पूजेनंतर त्यांनी तिथल्या नोंदवहीत अभिप्रायही नोंदवला पण त्यात नेमकं स्वतःचं पदच चुकीचं लिहिल्यानं त्या नोंदीचा फोटोही व्हायरल होतोय.

राजस्थानात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी अजमेरला भेट दिली. तिथल्या प्रसिद्ध अजमेर साहेब दर्ग्यात त्यांनी दर्शन घेतलं. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हेसुद्धा त्यांच्या समवेत होते.

त्यानंतर राहुल गांधी तिथून जवळच असणाऱ्या पुष्करकडे निघाले. पुष्कर सरोवराच्या ठिकाणी असणाऱ्या मंदिरात त्यांनी पूजाही केली. पूजेसाठी तिथल्या गुरुजींनी गोत्र विचारल्यावर राहुल यांनी ते कौल ब्राह्मण असल्याचं सांगितल्याचं समजतं. त्यांनी आपलं गोत्र दत्तात्रेय असल्याचीही नोंद केल्याचं समजतं.

या मंदिरात राहुल गांधी यांचे पूर्वज मोतिलाल नेहरू, इंदिरा गांधीसुद्धा येऊन गेल्याचं तिथले पुजारी सांगतात. त्यांनी पुराव्यादाखल जुनी नोंदवहीसुद्धा दाखवली. त्यामध्ये १९२१ साली मोतिलाल नेहरू तिथे आल्याची नोंद आहे. १६ मार्च १९२१रोजी केलेली ही नोंद आहे.

दरम्यान पुष्करच्या पूजेनंतर तिथल्या अभिप्राय वहीत राहुल गांधी यांनी नोंद केली. त्या वेळी स्वतःचं पदच चुकीचं लिहिल्याची चर्चा आहे.

भारत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केलेली ही नोंद. ज्याच्या खाली राहुल गांधींनी २६ नोव्हेंबर २०१८ या दिनांकासह स्वाक्षरी केलेली आहे.

राहुल गांधी यांनी जय हिंद बरोबरच वंदे मातरम असंही लिहिलं आणि भारत तसंच विश्वशांतीची कामना करत असल्याचं लिहिलं.

...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

First published: November 26, 2018, 3:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading