राहुल गांधींशी टक्कर देणार 'हे' 3 राहुल गांधी

राहुल गांधींशी टक्कर देणार 'हे' 3 राहुल गांधी

दक्षिण भारतातील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांच्याशी टक्कर देण्यासाठी 2 राहुल गांधी रिंगणात आहेत.

  • Share this:

वायनाड (केरळ) 6 एप्रिल : दक्षिण भारतातील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांच्याशी टक्कर देण्यासाठी 2 राहुल गांधी रिंगणात आहेत.

केरळमधून राहुल गांधी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. भाजप आणि कम्युनिस्ट पक्ष या दोन विरोधकांबरोबरच त्यांना आणखी तिघा गांधींशी टक्कर द्यावी लागणार आहे. वायनाडमधून राहुल गांधी यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर त्याच नावाचे आणखी 3 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी दोघांची नावं राहुल गांधी आहेत तर एकाचं आडनाव गांधी आहे.

वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज मागे घ्यायची तारीख आहे 8 एप्रिल. त्यानंतर आता प्रत्यक्षात एकमेकांविरोधात किती राहुल गांधी लढत आहेत हे निश्चित होईल. नामसाधर्म्यामुळे मतविभागणी व्हायची शक्यता असते आणि हा काही निवडणुकीतला नवा खेळ नाही. पण दक्षिणेत राहुल आणि गांधी फार सामान्य नावं नसतानाही ३ राहुल गांधी उभं राहणं रंजक आहे.

वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अपक्ष गांधींपैकी एकाचं नाव के. ई. राहुल गांधी आहे. त्यांच्याकडे M.Phil पदवी आहे आणि ते सामाजिक कार्यकर्ते असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रकात म्हटलं आहे.

दुसरे आहेत के. राहुल गांधी. हे कोईम्बतूरचे आहेत आणि तिसरे आहेत के. एम. शिवप्रसाद गांधी, जे त्रिसूरचे आहेत.

नावाचा खेळ नवा नाही

नामसाधर्म्यामुळेच मतांचं गणित बदलणं काही नवीन नाही.  2014 च्या  आणि थेट केंद्रीय मंत्रिपदाची वाट मोकळी झाली.... हे घडलं मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि अनंत गीते यांच्या बाबतीत.

2014 ची निवडणूक रायगड लोकसभा मतदारसंघात अगदी चुरशीची झाली होती. मतमोजणीच्या दिवशी अगदी एकेका क्षणाला कल बदलत होते. शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात अटीतटीची लढत सुरू होती. शेवटी अनंत गीते निवडून आले अवघ्या 2110 मतांनी. दुसऱ्या दिवशी सविस्तर आकडेवारी जाहीर झाली, त्या वेळी पुढे आलं की, एका सुनील तटकरे नावाच्या अपक्ष उमेदवाराला मिळाली होती 9849 मतं. म्हणजे या अपक्ष सुनील तटकरेंनीच अनंत गीतेंचा विजय सुकर केला होता.

तुल्यबळ प्रतिस्पर्धी असेल तर बोगस उमेदवार उभं करण्याची पद्धत काही नवी नाही. पण थेट केंद्रीय मंत्रिपदाचा मार्ग या अशा नामसाधर्म्याने मिळण्याची गोष्ट विरळा असेल.

विशेष म्हणजे या वर्षी युती आणि आघाडी दोघांकडूनही असे बोगस उमेदवार उभे करण्याचा फंडा याच मतदारसंघात करण्यात आला. रायगड मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेच्या अनंत गीते आणि राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्याव्यतिरीक्त 2 सुनील तटकरे आणि 1 अनंत गीते अपक्ष म्हणून उभे आहेत. यातल्या अनंत गीते यांचा अर्ज अवैध ठरणार असल्याची बातमी सामना या दैनिकात प्रसिद्ध झाली आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मतदारसंघातलं खरं चित्र स्पष्ट होईल.

रायगड मतदारसंघ 2014चा निकाल

अनंत गीते (शिवसेना) 396178

सुनील दत्तात्रय तटकरे (राष्ट्रवादी) 394068

सुनील तटकरे (अपक्ष) 9849

First published: April 6, 2019, 10:22 PM IST

ताज्या बातम्या