काँग्रेसला अच्छे दिन येणार का? अध्यक्षपदासाठी ही पाच नावं चर्चेत

काँग्रेसला अच्छे दिन येणार का? अध्यक्षपदासाठी ही पाच नावं चर्चेत

Congress New President : काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता अशोक गेहलोत यांच्याशिवाय आणखी चार नावं देखील चर्चेत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जून : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असं राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यामुळे काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. राहुल गांधी यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर काँग्रेस वर्किंग समिती काही नावांवर चर्चा करत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्बत होणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पण, सुशिलकुमार शिंदे, मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची नावं देखील चर्चेत आहेत. पण, या सर्वांना मागे टाकत अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्बत होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अशोक गेहलोत यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्षांची देखील नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

पहिला Air Strike नरेंद्र मोदींनी नाही तर वाजपेयींनी केला होता

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

लोकसभेतील दारूण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना रोखलं. त्यानंतर देखील आपल्या निर्णयावर ठाम राहत राहुल गांधी यांनी गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष नेमण्याची अट ठेवली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्षपदी मिळणार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

भारत अमेरिकेकडून खरेदी करणार 10 बिलियन अमेरिकन डॉलरची शस्त्रं

विरोधकांना मिळेल उत्तर

गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती ही काँग्रेसच्या अध्यक्षपदी आल्यास घराणेशाहीच्या आरोपांना प्रत्युत्तर मिळेल असा देखील एक अंदाज वर्तवला आहे. शिवाय, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यानंतर देशभर दौरे करत कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहे. जवळपास वर्ष ते दीड वर्षानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी येणार असल्याची देखील चर्चा आहे.

...आणि संभाजीराजे ढसाढसा रडू लागले, पाहा VIDEO

First published: June 24, 2019, 2:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading