• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • संसदीय समितीच्या बैठकीत बोलू दिलं नाही म्हणून राहुल गांधी झाले नाराज; पाहा काय केलं

संसदीय समितीच्या बैठकीत बोलू दिलं नाही म्हणून राहुल गांधी झाले नाराज; पाहा काय केलं

या सभेत राहूल गांधी यांना बोलू दिलं नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 डिसेंबर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदीय समितीसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि अन्य दोन कॉंग्रेस नेते संरक्षणविषयक संसदीय समितीच्या बैठकीतून मध्येच बाहेर पडले. पॅनेलमध्ये सशस्त्र दलाच्या गणवेशाबाबत चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. यावर राहुल गांधी नाराज होते. यावेळी मधे त्यांना काहीतरी बोलायचे होते, परंतु राहूल बोलत असताना भारतीय जनता पक्षाचे खासदार जुअल ओरम यांनी त्यांना बोलू दिले नाही. यामुळे नाराज होऊन राहूल गांधी बैठकीत मधूनच बाहेर पडले. राहूल गांधी नियंत्रण रेषेवरील जवानांचा मुद्दा उचलू इच्छित होते. ते म्हणाले की, राजकीय नेतृत्वाला राष्ट्रीय सुरक्षा आणि लडाखमधील चीनसोबत लढणाऱ्या जवानांना कसे मजबूत करता येऊ शकतं, यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणं आवश्यक आहे. या सभेत त्यांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना बोलण्याची परवानगी नव्हती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. माजी लेफ्टनंट जनरल आणि हरियाणा राज्यसभेचे खासदार देवेंद्र पॉल वत्स यांनी गणवेशात बदल करण्याचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा हा वाद उघडकीस आला. यानंतर राहुल गांधींना हे जाणून घ्यायचे होते की राजकारण्यांना सैन्याचा गणवेश व दर्जा का ठरवायचा आहे. या बैठकीत कॉंग्रेसचे (Congress) नेते राजीव सातव आणि रेवनाथ रेड्डीही राहुलसमवेत बाहेर आले. या सभेत सैनिकांना अधिक चांगली शस्त्रे देण्याऐवजी पॅनेल युनिफॉर्मवर बोलून वेळ वाया घालवत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. या बैठकीला संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत हे देखील उपस्थित होते. माध्यमांच्या वृत्तानुसार चर्चेदरम्यान राहुल म्हणाले की, सैन्याचे वरिष्ठ अधिकारीही यामध्ये निर्णय घेऊ शकतात.
  Published by:Meenal Gangurde
  First published: