सोनियांच्या बैठकीतून आता राहुल गांधींची सुटी

सोनियांच्या बैठकीतून आता राहुल गांधींची सुटी

काँग्रेसच्या 24 अकबर रोडवरच्या मुख्यालयात आता राहुल गांधींसाठी स्वतंत्र कक्षही नाही. ज्या नेत्यांना राहुल गांधींना भेटायचं असेल ते त्यांच्या 10 जनपथ निवासस्थानीच भेटतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची अनेक वेळा मनधरणी केली पण राहुल गांधींनी काही ऐकलं नाही. आता तर ते काँग्रेसच्या बैठकीतही उपस्थित नव्हते. ज्या बैठकीत राहुल गांधी नाहीत अशी काँग्रेसची ही पहिलीच बैठक होती.

सोनिया गांधींनी पक्षाचे महासचिव, राज्याचे प्रभारी, विधिमंडळ पक्षाचे नेते या सगळ्यांची बैठक बोलवली होती पण राहुल गांधी कोणत्याच पदावर नसल्याने ते बैठकीला आले नाहीत. राहुल गांधी आता काँग्रेसचे फक्त सदस्य आणि वायनाडचे खासदार आहेत.

राहुल गांधींची इच्छा असती तर ते या बैठकीला येऊ शकले असते. पण त्यांच्या निकटवर्तियांच्या मते, त्यांनी जे पद सोडलं आहे ते काही दिखाव्यासाठी सोडलेलं नाही. त्यांनी प्रामाणिकपणे हा निर्णय घेतला आहे. त्यांची आवश्यकता असेल तिथेच ते त्यांचा सहभाग नोंदवतील, असंही त्यांनी सांगितलं.

चांद्रयान - 2: लँडरला जिवंत करण्यासाठी NASAचे जबरदस्त प्रयत्न, असा पाठवला मेसेज!

याआधी राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही मिनिटांसाठी सहभाग घेतला होता. याच बैठकीत त्यांचा राजीनामा घेतला गेला आणि सोनिया गांधींची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली. याच बैठकीत काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर चर्चा होती. तेव्हा राहुल गांधींनी चर्चेत भाग घेतला.

काँग्रेसच्या 24 अकबर रोडवरच्या मुख्यालयात आता राहुल गांधींसाठी स्वतंत्र कक्षही नाही. याच मुख्यालयात सोनिया गांधी आणि महासचिव असलेल्या प्रियांका गांधींसाठी स्वतंत्र कक्ष आहे.

आता ज्या नेत्यांना राहुल गांधींना भेटायचं असेल ते त्यांच्या 10 जनपथ निवासस्थानीच भेटतात. राहुल गांधींच्या घरीच प्रियांका गांधीही लोकांच्या भेटीगाठी घेतात.

=======================================================================================

VIDEO: आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 04:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading