Home /News /national /

अ‍ॅक्टरऐवजी क्रिकेटर; सुशांतबाबत राहुल गांधींच्या 'त्या' ट्वीटचं FACT CHECK

अ‍ॅक्टरऐवजी क्रिकेटर; सुशांतबाबत राहुल गांधींच्या 'त्या' ट्वीटचं FACT CHECK

भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी दावा केला आहे की राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्याचाच काही भाग एडिट करुन रिलिज केला जात आहे.

भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी दावा केला आहे की राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्याचाच काही भाग एडिट करुन रिलिज केला जात आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांनी सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) निधनानंतर केलेलं ट्विट व्हायरल होतं आहे.

    नवी दिल्ली, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. फक्त बॉलीवूड, क्रीडा क्षेत्रातच नाही तर राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी (rahul gandhi tweet) देखील ट्वीट केलं होतं. त्यांचं हे ट्वीट व्हायरल होतं आहे आणि याला कारण म्हणजे त्यांनी या ट्वीटमध्ये केलेली चूक. राहुल गांधी यांनी सुशांतच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी ट्वीट केलं. ज्यामध्ये त्यांनी सुशांतचा उल्लेख क्रिकेटर असा केला आणि हे ट्वीट व्हायरल होऊ लागलं. खरंच राहुल गांधी यांनी अशी चूक केली होती का? राहुल गांधी यांच्या व्हायरल होणाऱ्या ट्वीटमध्ये कितपत तथ्य आहे? त्या ट्वीटची पडताळणी न्यूज 18 ने केली. पडताळणीत राहुल गांधी याचंं व्हायरल होणारं हे ट्वीट फेक असल्याचं समोर आलं. त्यांच्या ट्वीटसह छेडछाड करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सुशांतचा उल्लेख अ‍ॅक्टर असाच केला होता. राहुल गांधी यांचं खरं ट्वीट असं होतं. राहुल गांधी म्हणाले होते, "सुशांत सिंह राजपूतच्या निधन झाल्याचं ऐकून मला वाईट वाटलं. आपण एक तरुण आणि टॅलेन्टेड अभिनेता गमावला. त्याचं कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे" हे वाचा - 'सुशांतची आत्महत्या नव्हे मर्डर', करण जोहरचं नाव घेत कंगनानंतर बबिताचाही आरोप दरम्यान राहुल गांधींच्या ट्वीटसह छेडछाड केल्यानंतर ट्विटर युझर्सनी राहुल यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं, "राहुल गांधी यांच्या ट्विटसह छेडछाड केली गेली याबाबत मी नि:शब्द आहे. शोक संदेशातही असं करण्यात आलं आहे" संपादन - प्रिया लाड हे वाचा - सुशांत सिंहला शेवटचा मेसेज करताना या अभिनेत्याला आला होता संशय
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Rahul gandhi, Sushant Singh Rajput, Tweet

    पुढील बातम्या