Article 370वर राहुल गांधींनी अखेर सोडलं मौन, म्हणाले...

Article 370वर राहुल गांधींनी अखेर सोडलं मौन, म्हणाले...

Article 370 : अखेर 24 तासांनंतर राहुल गांधी यांनी आपलं मौन सोडत मोदी सरकारवर टीका केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी (5 ऑगस्ट) घेतला. मोदी सरकारच्या या निर्णयाचं कोणी समर्थन केलं तर काहींनी कडाडून विरोध केला. पण या चर्चादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. अखेर 24 तासांनंतर राहुल गांधी यांनी आपलं मौन सोडत मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी कलम 370 संदर्भात ट्विट करत म्हटलं की, 'केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय म्हणजे संविधानाचं उल्लंघन आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्याची येण्याची शक्यता आहे.'

नेमकं काय आहे ट्विट?

'देशाची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी एकतर्फी निर्णय घेऊन जम्मू-काश्मीरचे तुकडे केले जाऊ शकत नाहीत. यासाठी राज्यघटना धोक्यात घालून निवडून आलेल्या प्रतिनिधींना कारागृहात डांबलं जाऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरचे तुकडे करुन राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देता येणार नाही.  मिळालेल्या अधिकारांचा दुरुपयोग म्हणजे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे', असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, काँग्रेस पार्टीनं केंद्र सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध दर्शवला आहे. तसंच राज्यसभेत या प्रस्तावाविरोधात मतदान केलं.

(वाचा : Article 370 : सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान मिळणार? ‘ही’ आहे अडचण)

काँग्रेसचे मोदी सरकारवर गंभीर आरोप

जम्मू-काश्मीर पुर्नरचना विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी हे विधेयक लोकसभेत मांडलं. राज्यसभेप्रमाणेच लोकसभेतही काँग्रेसनं या विधेयकास तीव्र विरोध दर्शवला. लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याची आक्रमक प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली. एवढंच नाही या विधेयकाविरोधात मतदानही केलं. याव्यतिरिक्त टीएमसी, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सनं देखील विरोधी मतदान केलं. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी तर मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. मोदी सरकारनं मांडलेलं विधेयक घटनाबाह्य असल्याचा आरोप चौधरी यांनी केली. यादरम्यान अमित शहा आणि त्यांच्या शाब्दिक चकमकदेखील उडाली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये आता होतील हे 10 मोठे बदल, 70 वर्षातला मोठा निर्णय

1) जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांचा दुहेरी नागरिकत्व संपणार. इतर राज्यांप्रमाणेच तेही भारताचे नागरिक होतील.

2) आता देशातल्या इतर राज्यांमध्ये नागरिक जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन आणि संपत्ती घेऊ शकतील.

3) केंद्र सरकारच्या सर्व कायद्यांची आता जम्मू आणि काश्मीरमध्ये थेट अंमलबजावणी होईल.

4) जम्मू आणि काश्मीरसाठी वेगळे कायदे करण्याची गरज राहणार नाही.

5) कलम 360 नुसार केंद्र सरकार आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकते.

6) आतापर्यंत राज्याचा आणि केंद्राचा असे दोन राष्ट्रध्वज होते. आता मात्र फक्त तिरंगा हा एकच ध्वज असेल.

7) देशातल्या इतर राज्यांप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता दर पाच वर्षांनी निवडणुका होती. आधी दर सहा वर्षांनी निवडणुका होत होत्या.

8) राज्यातलं पोलीस दल आता केंद्राच्या अधिकारात येईल.

9) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि काश्मीर खोऱ्यात शाखा उघडता येतील.

10) आता खोऱ्यातही हिंदू आमदार निवडून येऊ शकतील.

घटनेतलं हे कलम हटविणं हा जनसंघापासून भाजपचा अजेंडा होता. त्यामुळे आता गेली अनेक वर्ष दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचा दावा भाजप करणार आहे. स्वातंत्र्यानंतर 370 कलम काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं होतं. राज्याला देण्यात आलेल्या विशेष अधिकारामुळं राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचाही अधिकार नव्हता. देशात आर्थिक आणीबाणी लागू केली तरी ती काश्मीरमध्ये मात्र लागू होत नव्हती . भारतातील इतर राज्यांत लागू झालेले कायदेही इथं लागू करता येत नव्हते. आता हे सगळच बदलणार आहे.

VIDEO: काश्मीरप्रश्नी अमित शहांचा आक्रमक अंदाज म्हणाले, आम्ही बलिदानही देऊ!

Published by: Akshay Shitole
First published: August 6, 2019, 2:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading