S M L

'न खाऊँगा, न खाने दूँगा', चं काय झालं? राहुल गांधींची ट्विटरवरून पंतप्रधानांवर टीका

देशाचे चौकीदार म्हणवणारे आता कुठे गेले असा प्रश्न विचारणारं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. यात त्यांनी मोदींवर निशाना साधला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 20, 2018 08:12 AM IST

'न खाऊँगा, न खाने दूँगा', चं काय झालं? राहुल गांधींची ट्विटरवरून पंतप्रधानांवर टीका

20 फेब्रुवारी : राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केली आहे. यावेळी संदर्भ आहे नीरव मोदींचा. देशाचे चौकीदार म्हणवणारे आता कुठे गेले असा प्रश्न विचारणारं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. यात त्यांनी मोदींवर निशाना साधला आहे.

'आधी ललित मोदी, नंतर विजय मल्ल्या आणि आता नीरव मोदी प्रकरण उघड झालं आहे. पण 'न खाऊँगा, न खाने दूँगा', चं काय झालं?' असं या ट्विटमध्ये लिहण्यात आलं आहे.

'११ हजार कोटींचा घोटाळा करून नीरव मोदीनं परदेशात पळ काढलाय तरीही पंतप्रधान यावर काहीही बोलायला तयार नाहीत', असंही राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 08:12 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close