'सुदैवानं, या सरकारचं एकच वर्ष उरलंय'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

'सुदैवानं, या सरकारचं एकच वर्ष उरलंय'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

फक्त दिखाऊ योजना, त्याच्या जोडीला निधी नाही. अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

  • Share this:

02 फेब्रुवारी : काल सादर झालेल्या केंद्रिय अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी ट्विटरवरून टीका केली आहे. ४ वर्षं उलटून गेली तरी हमीभावाचं आश्वासनच देते आहेत. फक्त दिखाऊ योजना, त्याच्या जोडीला निधी नाही. अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

तरुणांना नोकऱ्या नाहीत, सुदैवानं, या सरकारचं आता एकच वर्ष उलरंल, असं राहुल यांनी ट्विट केलं आहे.

त्यांच्या या ट्विटमध्ये ते म्हणाले की, '4 वर्षे उलटून गेली पण तरी हे सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतं आहे. ४ वर्षं उलटून गेली तरी हमीभावाचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. 4 वर्ष झाली तरी तरुणांना नोकऱ्या नाहीत. सुदैवानं, या सरकारचं आता एकच वर्ष उलरंले आहे'.

त्यांच्या या ट्विटला ८ हजार २०० रिट्विट्स आहेत, तर २० हजार लोकांनी लाईक केलंय.

 

First published: February 2, 2018, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading