• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राहुल गांधींनी सांगितला हिंदुत्व आणि हिंदू धर्मातील फरक; भाजपने दिलं प्रत्युत्तर

राहुल गांधींनी सांगितला हिंदुत्व आणि हिंदू धर्मातील फरक; भाजपने दिलं प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्या हिंदू धर्म आणि हिंदुत्व (Rahul Gandhi on Hinduism and Hindutva) यातील फरक सांगणाऱ्या विधानावरुन गदारोळ झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्यानंतर आता राहुल गांधी यांच्या हिंदू धर्म आणि हिंदुत्व (Rahul Gandhi on Hinduism and Hindutva) यातील फरक सांगणाऱ्या विधानावरुन गदारोळ झाला आहे. कोणत्याही शीख किंवा मुस्लिमाला मारहाण करणे हा हिंदू धर्म नसून हिंदुत्व आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी वर्धा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ऑनलाइन प्रशिक्षण शिबिराला संबोधित करत होते. याठिकणाी कार्यकर्त्यांना 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान महागाई विरोधात देशव्यापी जनजागृती मोहीम कशी राबवायची याचे प्रशिक्षण दिले जात होते. Gujrat : रस्त्याच्या कडेला नॉनव्हेजच्या दुकानांवर बंदी; खाणाऱ्यांवरही कारवाई? सलमान खुर्शीद, शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या हिंदुत्ववादी वक्तव्यावरुन झालेला गदारोळ अजून थांबला नव्हता, अशातच काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्यापैकी एक असलेल्या राहुल गांधींच्या वक्तव्याने आगीत इंधन टाकण्याचे काम केले आहे. हिंदू धर्म हिंदुत्वापेक्षा वेगळा असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, शीख किंवा मुस्लिमाला मारहाण करणे हा हिंदू धर्म नसून हिंदुत्व आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपने चौफेर हल्ला चढवला. राहुल गांधी परदेशातून परत आल्यावर नवनवीन ज्ञान देतात, असे गिरीराज सिंह म्हणाले. तर खासदार हरिनाथ यादव म्हणाले की, गांधींचं काँग्रेस संपवण्याचे आपलं स्वप्न राहुल गांधी आपल्या विधानांनी नक्कीच पूर्ण करतील. भारतासोबतच्या संबंधाबाबत तालिबाननं केलं मोठं विधान, प्रवक्त्यानं म्हटलं... राहुल गांधींनी उघडपणे हिंदुत्वाच्या विरोधात बोलल्यानंतर पक्षाचे तेच नेते त्यांना पाठिंबा देत आहेत, जे कालपर्यंत सलमान खुर्शीद यांचं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत असल्याचे सांगत होते. मीम अफझल यांनी सांगितलं की हिंदू धर्म हजारो वर्षांपासून भारतात आहे आणि त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की तो सहिष्णू आहे आणि सर्वांना स्वीकारतो. मात्र आजचे हिंदुत्व तसे करत नाही म्हणून राहुल गांधी म्हणाले की हिंदू धर्म आणि हिंदुत्व यात फरक आहे. फरक प्रत्येकाने जवळून समजून घेतला पाहिजे कारण आजचे हिंदुत्व हे भाजपचे राजकीय हित साधण्याचे साधन बनले आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: