• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • माझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर 

माझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर 

एका संपादकांनी त्यांना त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा उत्तर देताना त्यांनी माझं आधीच लग्न झालेलं आहे असं उत्तर दिलं.

 • Share this:
  हैदराबाद,ता.14 ऑगस्ट : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तो प्रश्न राजकीय नाही तर तो प्रश्न आहे त्यांच्या लग्नाचा. राहुल सध्या दोन दिवसांच्या हैदराबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज त्यांनी स्थानिक संपादकांशी चर्चा केली. त्यावेळी एका संपादकांनी त्यांना त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा उत्तर देताना त्यांनी माझं आधीच लग्न झालेलं आहे असं उत्तर दिलं. त्यावर सगळेच आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहात असतानाच त्यांनी लगेच माझं आधीच काँग्रेस पक्षासोबत लग्न झालं आहे असं स्पष्ट केलं आणि बैठकीत सगळेच हास्यकल्लोळात बुडून गेले. संपादकांशी बोलताना राहुल गांधींनी दावा केला की 2019 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 230 जागा मिळणार नाहीत त्यामुळे ते पंतप्रधान होण्याचा प्रश्नच असणार नाही. काँग्रेस आणि इतर भाजप विरोधी पक्षांना बहुमत मिळालं तर कोण पंतप्रधान होणार या प्रश्नावर त्यांनी सावध उत्तर दिलं. या प्रश्नावर काम सुरू आहे. निवडणुका झाल्यावर अडचण येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची स्थिती सुधारेल तर तेलंगणात काँग्रेस सत्तेवर येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आंध्रात काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. देशात असहिष्णुता वाढत असून अल्पसंख्याक आणि दलितांना असुरक्षीत वाटत आहे असा आरोपही त्यांनी केला. रोजगाराच्या प्रश्नावर केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. चीन 24 तासांमध्ये 50 हजार तरूणांना रोजगार देतं तर भारतात फक्त 458 लोकांना रोजगार मिळतो. केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.   राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी
  First published: