राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर

राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीला आता अवघे 38 दिवस उरलेत.आणि त्यामुळे राहुल गांधी असो किंवा पंतप्रधान मोदी, दोघांच्याही गुजरात वाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.

  • Share this:

01 नोव्हेंबर: राहुल गांधी आज पुन्हा गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. विधानसभा निवडणुकीला आता अवघे 38 दिवस उरलेत.आणि त्यामुळे राहुल गांधी असो किंवा पंतप्रधान मोदी, दोघांच्याही गुजरात वाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.

पाटीदार नेते अजून काँग्रेसबाबत तटस्थ आहेत. हार्दिक पटेलनं याआधी राहुल गांधींचा दौरा उधळून लावू, असा इशारा दिला होता. पण तो इशारा त्यानं आता मागे घेतलाय. पाटीदार समाजाच्या मागण्या हार्दिक आणि इतर नेत्यांनी काँग्रेसपुढे मांडल्या आहेत. त्या मान्य असतील तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, अशी त्यांची भूमिका आहे.काही दिवसांपूर्वी काही पाटीदार नेत्यांनी भाजपमधून एक्झिट घेतली होती. तसंच तिथे पैशे देऊन नेते विकत घेत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता पाटीदार समाजाचे नेते कुणासोबत जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार  आहे. तसंच इतरही समाजांची मत मिळवण्यासाठी काँग्रस प्रयत्नशील दिसते आहे.

त्यामुळे काँग्रेस काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.तसंच या निवडणुकीत कोण जिंकणार याकडे आता साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

First published: November 1, 2017, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading