राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानानंतर 150 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Congress President राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून 150 काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सादर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 09:24 AM IST

राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानानंतर 150 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

नवी दिल्ली, 29 जून : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी ‘मला दु:ख आहे की, माझ्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला नाही’ अशी प्रतिक्रिया दिला. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर मात्र आता काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरू झालं असून आतापर्यंत 150 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या स्थानावरील नेत्यांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. पक्षाचे महासचिव दीपक बाबरियासोबत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी युथ काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या घरावर धडकले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा विचार सोडावा असा आग्रह धरला.

पुण्यात मृत्यूचे तांडव; 15 जण ठार, ही आहेत मृतांची नावे

‘सत्ता हवी असल्यास भाजपमध्ये जा’

दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी मी राजीनाम्यावर ठाम आहे. पण, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. मी पूर्ण क्षमतेनं लढा देणार. आज मी निवडणुका हरलो आहे. पण, मी कुणाकडे बोट दाखवल्यास तीन बोटं माझ्याकडे असणार आहे. शिवाय, ज्यांना लगेचच सत्ता हवी त्यांनी भाजपकडे जावं. पण, जो शेवटपर्यंत लढा देईल तोच खरा शिपाई’ असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

कुणी दिला राजीनामा

Loading...

शुक्रवारी दिल्ली काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राजेश लिलोठिया, हरियाणा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुमित्रा चौहान, तेलंगना काँग्रेस उपाध्यक्ष पूनम प्रभाकर आणि मध्य प्रदेशचे प्रभारी दिपक बावरिया यांनी आपल्या पदांचा राजीनामा पक्षाकडे सादर केला.

SPECIAL REPORT: भाजपचे चाणक्य आघाडीच्या निशाणावर, चंद्रकांतदादांच्या अडचणी वाढ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 09:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...