News18 Lokmat

राहुल गांधी दक्षिणेच्या 'या' जागेवरून निवडणूक लढणार?

राहुल गांधी आता दक्षिण भारतातून निवडणूक लढवणार का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 02:26 PM IST

राहुल गांधी दक्षिणेच्या 'या' जागेवरून निवडणूक लढणार?

नवी दिल्ली, 23 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळची एक जागा लढावी यासाठी दक्षिण भारतातल्या काँग्रेस नेत्यांचा आग्रह आणि दबाव वाढतो आहे. राहुल गांधी केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस हाय कमांड उत्तर भारताबरोबर दक्षिण भारतातल्या एखाद्या मतदारसंघातून निवडणुका लढवतात, हा इतिहास आहे. यात नवीन काही नाही. बेल्लारी मतदारसंघ हे याचं उदाहरण. त्यामुळे राहुल गांधीसुद्धा या वेळी केरळहून एक जागा लढवण्याचा आग्रह मान्य करतील असं लक्षण आहे.


तसं झालं तर राहुल अमेठीची जागा लढवणार का? की फक्त वायनाडची लढवणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी यापूर्वी दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली आहे आणि जिंकलीही आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा वायनाड आणि अमेठी या दोन्ही जागा लढवू शकतात. याचीच शक्यता जास्त आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव ओमेन चंडी यांनी राहुल गांधींकडे अशी विनंती केल्याचं मान्य केलं आहे. अद्याप काँग्रेसकडून राहुल यांच्या उमेदवारीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

केरळमधली वायनाडची जागा सध्या रिकामी आहे. 2014 मध्ये निवडून आलेले खासदार एम. एल. शहनवाझ यांचं सहा महिन्यापूर्वीच निधन झालं. त्यामुळे वायनाडची जागा रिकामीच आहे. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी वायनाडमधून राहुल यांनाच निवडणूक लढवण्याचा आग्रह आण्ही करत आहोत, असं सांगितलं.

पण टी सिद्दिकी यांना ही जागा देण्यात आल्याची घोषणा झआली होती. भारताच्या भावी पंतप्रधानासाठी आपण आपल्या तिकिटावर पाणी सोडण्यास तयार आहोत, असंही सिद्दीकी म्हणाल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.


( ही बातमी अपडेट होत आहे.)


चिमुरडीच्या अंगावरुन गेली SUV कार; हृदयाचा ठोका चुकवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...