राजपथावर चौथ्या नाही, सहाव्या रांगेत बसले राहुल गांधी; काँग्रेसची नाराजी

राजपथावर चौथ्या नाही, सहाव्या रांगेत बसले राहुल गांधी; काँग्रेसची नाराजी

राजपथावरच्या कार्यक्रमात राहुल गांधींना चौथ्या रांगेत बसवलं जाणार असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमधून विरोध करण्यात आला होता. पण नंतर चौथ्या रांगेऐवजी राहुल गांधींना थेट सहाव्या रांगेत बसवण्यासाठी जागा दिली होती.

  • Share this:

26 जानेवारी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आजच्या 69व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर आयोजित कार्यक्रम भाग घेतला होता. राजपथावरच्या या कार्यक्रमात राहुल गांधींना चौथ्या रांगेत बसवलं जाणार असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमधून विरोध करण्यात आला होता. पण नंतर चौथ्या रांगेऐवजी राहुल गांधींना थेट सहाव्या रांगेत बसवण्यासाठी जागा दिली होती.

सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोंमध्ये राहुल गांधी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत बसले होते.

दर वर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्षांना व्हीव्हीआयपींच्या आसन कक्षात पहिल्या रांगेत स्थान दिलं जातं. पण यावर्षी काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याला पहिल्याच काय पहिल्या चार रांगामध्येही स्थान देण्यात आलं नाही.

या कार्यक्रमात आसिआनमधील ९ देशांचे राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती होती. पण त्यांच्यासमोर राहुल गांधींना सहाव्या रांगेत स्थान दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपने अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण खेळले आहे, असे काँग्रेसमधील नेत्यांनी म्हंटल आहे.

सूत्रांच्या सांगण्यानुसार, केंद्र सरकारच्या आदेशाशिवाय सुरक्षा अधिकारी असा निर्णय घेऊच शकत नाही, असा दावाही काँग्रेसकडून केला जात आहे. आसियानमधील नेत्यांसमोर आणि भारतीय जनतेसमोर काँग्रेसला कमी लेखण्याचा हा प्रकार आहे, असे काँग्रेसमधील नेत्यांनी सांगितलं आहे.

तर आसियान देशातील राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधींना समोरच्या रांगेत स्थान दिल्यामुळे राहुल गांधींना सहाव्या रांगेत स्थान दिलं अशी सरकारची भूमिका आहे. राहुल गांधींना कमी लेखण्याचा काहीच प्रयत्न नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.

First published: January 26, 2018, 8:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading