Yoga Day राहुल गांधींनी केला सैनिकांचा अपमान, अमित शहांचा आरोप

Yoga Day राहुल गांधींनी केला सैनिकांचा अपमान, अमित शहांचा आरोप

'काँग्रेसची नकारात्मकता अजुनही सुरूच आहे. काँग्रेसने तिहेरी तलाकला विरोध करत त्यांची मध्ययुगीन मानसिकता दाखवून दिली. आता ते योग दिनाचाही उपहास करत आहेत.'

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जून : सर्व जगभर आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातोय. योग दिनाच्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्विटवरून वादाला सुरुवात झालीय. राहुल गांधी यांनी जो फोटो ट्विट केला त्यावरून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केलीय. सौनिकांसोबत कुत्रेही योगासनं करत असतानाचा फोटो राहुल यांनी ट्विट केला होता. त्या फोटोवर त्यांनी फक्त New India असे दोन शब्द लिहिले होते. हा सैनिकांचा अपमान असल्याचं अमित शहांनी म्हटलं आहे.

लष्कराच्या सेकंड आर्मी डॉग युनिटच्या जवानांनीही आज योगासनं केली. लष्कराचं हे डॉग युनिट असल्यानं या कार्यक्रमात त्यांच्या कुत्र्यांनीही सहभाग घेतला. एका रांगेत कुत्रे आणि त्यांच्या पुढच्या रांगेत जवान योगासने करत आहेत. जवान जसं करताहेत तशीच कृती कुत्रेही करत होते. याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचं खूप कौतुकही झालं होतं.

मात्र राहुल गांधी यांनी हाच फोटो ट्विट करत त्यावर उपहासानं New India असं लिहिलं. यावरून सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्यावर टीका होतेय. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय.

अमित शहा म्हणाले, काँग्रेसची नकारात्मकता अजुनही सुरूच आहे. काँग्रेसने तिहेरी तलाकला विरोध करत त्यांची मध्ययुगीन मानसिकता दाखवून दिली. आता ते योग दिनाचाही उपहास करत आहेत. हे करताना त्यांनी  लष्कराचाही पुन्हा एकदा अपमान केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रात दिलेल्या पहिल्याच भाषणात सर्व जगाने 21 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं होतं. भारताच्या या ठरावाला जगातल्या जवळपास सर्वच देशांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर दरवर्षी हा दिवस जगभर योग दिवस म्हणून साजरा केला जातो.

First published: June 21, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading