राहुल गांधीच सुरक्षा घेत नाही, 100 वेळा केलं सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन-राजनाथ सिंग

राहुल गांधीच सुरक्षा घेत नाही, 100 वेळा केलं सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन-राजनाथ सिंग

राहुल गांधी सुरक्षेबाबत गंभीर नसून ते बुलेटप्रुफ कारचा वापर करण्यात टाळाटाळ करत असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

  • Share this:

08 आॅगस्ट : राहुल गांधी यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये सुरक्षेबाबत 100 नियमांचं उल्लंघन केलंय असं निवेदन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत दिलं. तसंच राहुल गांधी सुरक्षेबाबत गंभीर नसून ते बुलेटप्रुफ कारचा वापर करण्यात टाळाटाळ करत असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

गुजरातमधील बनासकांठा इथं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लाबाबत आज लोकसभेत गदारोळ झाला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत राहुल गांधी यांनीच 100 वेळा सुरक्षारक्षकांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केलं. राहुल गांधी जेव्हा गुजरात दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांना पुरेपुर सुरक्षा पुरवली होती. गुजरात सरकारकडून त्यांच्यासाठी बुलेटप्रुफ वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. एवढंच नाहीतर पोलीस आणि एसपीजी सुरक्षारक्षकांनी बुलेटप्रुफ गाडी वापरावी असा सल्ला दिला होता पण राहुल गांधी यांनी ऐकलं नाही आणि कार्यकर्त्यांच्या गाडीने प्रवास केला असा खुलासा सिंग यांनी केला.

राहुल गांधी प्रत्येक वेळा सुरक्षारक्षकाच्या नियमांची पायमल्ली करतात. हे पहिल्यांदाच घडलं नाही. मागील दोन वर्षांमध्ये जवळपास 200 वेळा राहुल गांधींनी सुरक्षारक्षकाच्या नियमांचं उल्लघंन केलं असा दावाही सिंग यांनी केला. तसंच राहुल गांधी 6 वेळा परदेश दौऱ्यावर गेले होते त्यावेळी ते 72 दिवस बाहेर होते त्यावेळी सुद्धा त्यांनी एसपीजीची सुरक्षा घेतली नाही असंही राजनाथ सिंग म्हणाले.

गुजरातमध्ये राहुल गांधी पुरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेले नव्हते तर पर्यटनसाठी गेले होते अशी टीकाही राजनाथ सिंग यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 03:35 PM IST

ताज्या बातम्या