राफेल घोटाळ्याला नरेंद्र मोदीच जबाबदार, राहुल गांधींचा पुन्हा आरोप

राफेल घोटाळ्याला नरेंद्र मोदीच जबाबदार, राहुल गांधींचा पुन्हा आरोप

  • Share this:

नवी दिल्ली 2 जानेवारी : राफेल घोटाळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. त्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केला. लोकसभेत आज राफेल प्रकरणावर चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेदरम्यान प्रचंड गदारोळ झाला.  या प्रकरणातली ऑडिओ क्लिप लोकसभेत ऐकवली पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली. मात्र अध्यक्षांनी ती मागणी फेटाळून लावली. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फेतच चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी पुन्हा एकदा केली.

राहुल यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

राफेल प्रकरणावर सर्व देश पंतप्रधानांच्या भूमीकेवर संशय व्यक्त करतोय. त्यांनी एकाही प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नाही.

पंतप्रधानां सर्वांसमोर येवून बोलण्याची हिंम्मत नाही.

राफेलचा जुना करार बदलून नवा करार का करण्यात आला. फक्त 36 विमानं खरेदी करण्याचा करार का करण्यात आला?

राफेलच्या किंमती का वाढल्या. काही कंपन्यांनाच का निवडलं या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागतील.

पंतप्रधानांनी आपल्या मुलाखतीत जे सांगितलं ते अपुरं आहे.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात जे सांगितलं ते सरकारच्या बाजूचं नाही.

किंंमतीची चौकशी करण्याचं आमच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचं फक्त सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

ऑडिओ टेपने खळबळ

राफेल कराराबाबतची महत्त्वाची फाईल माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आहे, असा दावा करत काँग्रेसने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. जारी केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये गोव्यातील भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी एक मोठा खुलासा केला आहे, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे.

ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर काँग्रेसने राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 'ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे मंत्री म्हणत आहेत की मनोहर पर्रिकरांकडे राफेलची महत्त्वाची माहिती आहे. मग राफेल कराराचं कोणतं रहस्य पर्रिकरांकडे आहे? सरकार राफेलच्या जेपीसी चौकशीला का घाबरत आहे?' असे अनेक प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केले आहेत.

First published: January 2, 2019, 2:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading