S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अवघ्या 2 तासांत बदललं चित्र, राफेल ऑडिओ क्लिपवरून लोकसभेत काँग्रेस बॅकफूटवर
  • VIDEO: अवघ्या 2 तासांत बदललं चित्र, राफेल ऑडिओ क्लिपवरून लोकसभेत काँग्रेस बॅकफूटवर

    News18 Lokmat | Published On: Jan 2, 2019 02:36 PM IST | Updated On: Jan 2, 2019 02:36 PM IST

    नवी दिल्ली, 2 जानेवारी : गोव्यातील भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांची राफेल कराराबाबतची काँग्रेसने जारी केलेल्या ऑडिओ क्लिपवरून लोकसभेत गोंधळ उडाला आहे. ही ऑडिओ क्लिप लोकसभेत ऐकवावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मात्र ही मागणी फेटाळली आहे. दरम्यान, राफेल कराराबातची महत्त्वाची फाईल माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आहे, असा दावा करत काँग्रेसने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. जारी केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये गोव्यातील भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी एक मोठा खुलासा केला आहे, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close