राहुल गांधींचा राजीनामा देण्याचा निर्णय, रजनीकांत म्हणाले...

राहुल गांधींचा राजीनामा देण्याचा निर्णय, रजनीकांत म्हणाले...

राहुल गांधी यांच्या या निर्णयावर आता सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 मे: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. राजीनामा देऊ नये यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विनंती केल्यानंतरही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहेत. गांधी कुटुंबाच्या बाहेरचा अध्यक्ष करावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या या निर्णयावर आता सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला विजय हा मोदींचा विजय आहे. मोदींचे नेतृत्व चमत्कारी आहे. भारताच्या राजकारणात पंडीत जवाहरलाल नेहरु, राजीव गांधी यांच्यानंतर आता मोदी यांचे चमत्कारी नेतृत्व देशाला मिळाले आहे, असे सांगत रजनीकांत यांनी मोदींचे व त्यांच्या विजयाचे कौतुक केले. तसेच 30 मे रोजी दिल्लीत होणाऱ्या मोदींच्या शपथविधीसाठी मी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. पक्षाला मिळालेल्या या अपयशाची जबाबदारी राहुल गांधी यांनी घेत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये. त्यांनी हे सिद्ध करावं की ते ही गोष्ट करु शकतात. लोकशाहीमध्ये विरोध सुद्धा मजबूत हवा, असे रजनीकांत म्हणाले.

राहुल गांधींचा राजीनामा म्हणजे आत्मघाती पाऊल

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी देखील राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असे मत व्यक्त केले आहे. राहुल यांनी राजीनामा दिल्यास ते एक आत्मघाती पाऊल ठरेल. त्यांचा राजीनामा संघा विरुद्ध लढणाऱ्या सर्व पक्षांसाठी आत्मघाती ठरले, असे लालू म्हणाले.

'टेलीग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत लालू म्हणाले, राहुल गांधींचा हा निर्णय म्हणजे भाजपच्या जाळ्यात अडकल्यासारखे होईल. गांधी-नेहरु कुटुंबाच्या बाहेरील अध्यक्ष झाल्यास त्या व्यक्तीला मोदी आणि शहा बाहुला करतील, असे देखील लालू म्हणाले.

VIDEO: दमदार विजयानंतर वडिलांच्या भाजप प्रवेशाबाबत काय बोलले सुजय विखे?

First published: May 28, 2019, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading