राहुल गांधींच्या सुरक्षा प्रकरणाला नवं वळण, SPGनं दिलं स्पष्टीकरण!

राहुल गांधींच्या सुरक्षा प्रकरणाला नवं वळण, SPGनं दिलं स्पष्टीकरण!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याच्या वृत्तावर अखेर पडदा पडला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 एप्रिल: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याच्या वृत्तावर अखेर पडदा पडला आहे. अमेठी येथे पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांच्या डोक्यावर लाईट पडला होता. त्यावरुन त्यांच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त आज दिवसभरात सुरु होते. राहुल गांधींवर स्नायपरने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे शंका व्यक्त करण्यात आली होती. पण यासंदर्भात राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात आलेल्या एसपीजीने यासंदर्भात खुलासा केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. याच दरम्यान राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त आल्याने दिवसभर याच एका बातमीची चर्चा सुरु होती. यासंदर्भात काँग्रेसने गृह मंत्रालयाला पत्र लिहल्याचे बोलले जात होते. पण गृहमंत्रालयाने अशा प्रकारचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगितले होते. यावर काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु संघवी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, काँग्रेस पक्षाने कोणत्याही गृहमंत्रालयाला या संदर्भात कोणतेही पत्र लिहले नाही.

राहुल गांधी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या डोक्यावर एक लाईट पडल्याचे दिसत होते. हा लाईट मोबाईलचा असल्याचे एसपीजीने स्पष्ट केले आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या कॅमेरामनच्या मोबाईलचा तो लाईट असल्याचे राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या एसपीजीने म्हटले आहे.त्यामुळे राहुल गांधींची सुरक्षितता आणि त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्यासंदर्भात दिवसभर सुरु असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.

VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading