मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO: पूर्वी मीडिया 24 तास माझी स्तुती करायचा, पण दोन निर्णयाने.. राहुल गांधी म्हणाले..

VIDEO: पूर्वी मीडिया 24 तास माझी स्तुती करायचा, पण दोन निर्णयाने.. राहुल गांधी म्हणाले..

राहुल गांधी म्हणाले..

राहुल गांधी म्हणाले..

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी जनतेसमोर दोन असे मुद्दे सांगितले, ज्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द बदलली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना टोला लगावला. ते म्हणाले, मी 2004 साली राजकारणात प्रवेश केला, तेव्हा आमचे सरकार होते. मीडिया 24 तास माझी स्तुती करत असे. पण, त्यानंतर एके दिवशी मी यूपीतील भट्टा परसौल येथे गेलो. तेथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा मी मांडला. मी ही बाब मांडताच ते माझ्या मागे लागले. भारत जोडो यात्रेवर निघालेले काँग्रेस खासदार राहुल गांधी अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून मार्गक्रमण करून शनिवारी राजधानी दिल्लीत पोहोचले. यावेळी उपस्थित लोकांनी राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

त्याआधी भारत जोडो यात्रेबाबत राहुल गांधी म्हणाले, या यात्रेचे उद्दिष्ट भारताला जोडणे आहे. जेव्हा आपण कन्याकुमारीपासून याची सुरुवात केली तेव्हा मी विचार करत होतो की द्वेष नष्ट करण्याची गरज आहे. कारण, देशात द्वेष पसरवला गेला आहे, हे माझ्या मनात होते. पण, जेव्हा मी चालायला सुरुवात केली, तेव्हा वस्तुस्थिती वेगळी होती. ते म्हणाले की, हा देश एक आहे. लाखो लोकांना मी रस्त्यावर भेटलो. प्रत्येकजण एकमेकांवर प्रेम करतो.

या गोष्टींसाठी राहुल गांधींनी संघर्ष केला

नियामगिरी जमीन हा ओडिशाचा विषय होता. वेदांत ग्रुप इथे खाण शोधत होता. त्यावेळी राहुल गांधींनी याला विरोध केला आणि शेवटी वेदांतला खाणीसाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली. दुसरीकडे, भट्टा परसौल हे उत्तर प्रदेशचे प्रकरण होते. येथे 2011 साली शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात मोठे आंदोलन केले. त्यावेळीही राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींना विरोध केला होता. राहुल गांधींचे हे पाऊल त्यांच्या राजकीय जीवनातील संस्मरणीय पाऊल मानले जाते.

वाचा - गोठवणाऱ्या थंडीत राहुल गांधी एका टी-शर्टमध्ये भारत जोडो यात्रा कशी करताय? कन्हैयांनी दिलं उत्तर

भारत जोडो यात्रेत दिल्ली-हरियाणातील शेकडो लोक सहभागी

हरियाणा आणि दिल्लीच्या बदरपूर सीमेवर दोन्ही राज्यातील शेकडो लोक मोर्चात सामील झाले आणि 'भारत जोडो' आणि 'राहुल गांधी झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. ढोल-ताशे आणि देशभक्तीपर गीते वाजत काँग्रेस प्रवाशांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तिरंगा फडकवत हजारो कार्यकर्त्यांनी राहुल यांच्यासोबत मिरवणूक काढली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही यात्रा मार्गावर उभे राहून पादचाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली.

दिल्लीतील भारत जोडो यात्रेच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बदरपूर ते आश्रमापर्यंत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बसेस तैनात करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी छावण्या लावल्या, त्या ठिकाणी गाणे आणि नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी काँग्रेस समर्थक ‘नफरत छोडो, भारत जोडो’ अशा घोषणा देताना दिसले.

First published:

Tags: Bharat Jodo Yatra, Rahul gandhi