नवी दिल्ली, 4 डिसेंबर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोड यात्रेदरम्यान आपल्या राजकीय जीवनावर मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जेव्हा ते राजकारणात नवखे होते, तेव्हा 5-6 वर्षे मीडियाने त्यांची भरभरून स्तुती केली. राहुल गांधी म्हणाले, 'मीडिया 24 तास माझी 'वाह-वाह' करताना थकले नाहीत, पण त्यानंतर असे काही घडले की सर्वकाही बदलले.'' राहुल गांधी यांनी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांच्या भारत जोडो यात्रा आणि जुन्या राजकीय दिवसांचा संग्रह आहे.
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणाले की, 'मी राजकारणात येताच दोन मुद्दे मांडले. एक नियमगिरी आणि दुसरे भट्ट परसौल. मी गरीबांबद्दल बोललो. भूमीवरील गरिबांच्या हक्काचे रक्षण करण्याबाबत मी बोललो, तेव्हा मीडियाचा तमाशा सुरू झाला. आम्ही आदिवासींसाठी पेसा कायदा आणि त्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी नवीन कायदे आणले. त्यानंतर 24 तास मीडियाने माझ्याविरोधात लिखाण सुरू केले.
मेरी मीडिया छवि का असली सच क्या है? https://t.co/PW4ZZqIN8b pic.twitter.com/IX9Lp91FgE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 4, 2022
राहुल गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल केला
राहुल म्हणाले, 'राजे-महाराजांच्या मालकीच्या संपत्ती कायद्याच्या माध्यमातून जनतेला देण्यात आल्या, पण भाजप मात्र याच्या उलट करत आहे. त्या जनतेकडून त्या संपत्ती परत घेऊन महाराजांना देत आहेत. भाजप त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करत आहेत. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे यानंतरही तसे होताना दिसत नाही. परिस्थिती कशीही असली तरी सत्य बाहेर येते.
वाचा - राहुल गांधींची भेट घेणं शिक्षकाला महागात पडलं; 'या' कारणामुळे आयुक्तांनी नोकरीवरुनच काढलं
ते म्हणाले, भाजपने माझी प्रतिमा मलिन केल्याने माझी ताकद वाढत आहे, कारण सत्य दाबता येत नाही. जेव्हा तुम्ही मोठ्या शक्तीशी संघर्ष करता तेव्हा तुमच्यावर वैयक्तिक हल्ले होतात. माझ्यावरील वैयक्तिक हल्ल्यांनी मी योग्य मार्गावर असल्याची खात्री झाली. ही गोष्ट माझा गुरु आहे. कोणता मार्ग निवडायचा हे मला शिकवते. आणि मग मी माझ्या लढ्यात पुढे जातो. जोपर्यंत मी पुढे जात आहे तोपर्यंत सर्व ठीक आहे.
या गोष्टींसाठी राहुल गांधींनी संघर्ष केला
नियमगिरी जमीन हा ओडिशाचा विषय होता. वेदांत ग्रुप इथे खाण शोधत होता. त्यावेळी राहुल गांधींनी याला विरोध केला आणि शेवटी वेदांतला खाणीसाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली. दुसरीकडे, भट्टा परसौल हे उत्तर प्रदेशचे प्रकरण होते. येथे 2011 साली शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात मोठे आंदोलन केले. त्यावेळीही राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींना विरोध केला होता. राहुल गांधींचे हे पाऊल त्यांच्या राजकीय जीवनातील संस्मरणीय पाऊल मानले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bharat Jodo Yatra, Rahul gandhi