मराठी बातम्या /बातम्या /देश /

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, फ्री वीज, 500 रुपयांत गॅस अन्.. गुजरातसाठी राहुल गांधींची बंपर ऑफर

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, फ्री वीज, 500 रुपयांत गॅस अन्.. गुजरातसाठी राहुल गांधींची बंपर ऑफर

Rahul Gandhi Manifesto in Gujarat Election: गुजरात निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. गुजरातमध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मोफत वीज, घरगुती कनेक्शनवर 300 युनिट मोफत वीज देण्याची आश्वासनेही राहुल गांधींनी दिली.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

अहमदाबाद, 5 सप्टेंबर : गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी अहमदाबादला पोहोचले. राज्यातील 27 वर्षांच्या सत्तेचा वनवास मोडून काढणार असल्याचे सांगत राहुल गांधींनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. गुजरातमध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मोफत वीज, घरगुती कनेक्शनवर 300 युनिट मोफत वीज देण्याची आश्वासनेही राहुल गांधींनी दिली.

राहुल गांधींनी दिलेली महत्त्वाची आश्वासने

काँग्रेस सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी गुजरातच्या जनतेला दिले. दुसरे आश्वासन राहुलने दिले की कोरोनामुळे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयासमोर रांगेत उभे असलेले लोक पाहिले असतील. शासनाने काही नुकसान भरपाई दिली आहे का? कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या अशा व्यक्तीच्या कुटुंबाला काँग्रेस चार लाख रुपयांची भरपाई देणार आहे.

शेतकऱ्यांची वीजबिल माफ करण्याचे तिसरे आश्वासन राहुल गांधींनी दिले आहे. राहुल म्हणाले की, गुजरातमधील सर्व शेतकऱ्यांची वीज थकबाकी माफ केली जाईल आणि दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाईल. याशिवाय गुजरातमध्ये तीन लाख शाळा बांधल्या जातील आणि मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल, असे आश्वासन राहुल यांनी दिले. तसेच राज्यात 1000 रुपयांचा एलपीजी गॅसचा सिलिंडर 500 रुपयांना देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

बेरोजगारी आणि महागाईपासून सुटका करण्याचे आश्वासनही राहुल गांधींनी दिले. छोट्या व्यापाऱ्यांना मदत केली जाईल, ज्यामुळे लहान आणि मध्यम व्यावसायिकांना बळ मिळेल, असे ते म्हणाले. गुजरातमधील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आणि 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचेही ते बोलले.

वाचा - अमित शहांची अवस्था गजनी सारखी का झाली? शिवसेनेचं भाजपला जशास तसं उत्तर

केजरीवालांसारखी खेळी?

गुजरातमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसने केजरीवाल यांच्यासारखा मोफत योजनांचा डाव खेळला आहे. कर्जमाफीची घोषणा करून काँग्रेसला शेतकऱ्यांची मने जिंकायची आहेत, असे दिसते. राहुल गांधी यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी, वीज मोफत देण्यासारखी अनेक महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांनुसार कर्जमाफी, 10 तास मोफत वीज, नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसान भरपाई योजना, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यमान जमीन सर्वेक्षण रद्द करणे, सर्व शेतमालाची आधारभूत किमतीवर खरेदी, दूध उत्पादकांना 5 रुपये महिना अनुदान. कृषी मालावरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्रावर दबाव टाकण्यासह आश्वासन पूर्ण करणार असल्याचे काँग्रेसने सांगितले.

ग्रामीण भागात काँग्रेस मजबूत

गुजरातमधील विधानसभेच्या 182 जागांपैकी 98 जागा अशा आहेत, ज्या ग्रामीण भागात येतात. या सर्व जागा राज्यात निर्णायक भूमिका बजावतात. या 98 जागांपैकी 80-85 टक्के जागाही ताब्यात घेतल्या तरी राज्यात सरकार स्थापन होऊ शकते. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सर्व आश्वासने देऊन काँग्रेसने ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा डाव खेळला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदारांच्या माध्यमातून काँग्रेसला 77 जागा जिंकण्यात यश आले होते. ग्रामीण भागात काँग्रेसचा पारडं जड होतं, पण शहरी भागातील साथ न मिळाल्याने सत्तेचा वनवास संपवण्यात त्यांना यश आले नाही. 2022 च्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही शेतकर्‍यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. सोबत मोफत वीज देण्याचे आश्वासनही दिले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते.

गुजरातमध्ये ग्रामीण भागात काँग्रेसची पकड नेहमीच मजबूत राहिली आहे तर शहरी भागात भाजपची आघाडी कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दृष्टीने राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठी पैज लावली असून ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

First published:

Tags: Gujrat, Rahul gandhi, काँग्रेस