News18 Lokmat

मोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, सरकार सुप्रीम कोर्टावर दबाव आणतंय. न्यायसंस्थांना कमी लेखलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ स्वत:मध्येच रस आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:29 PM IST

मोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी

नवी दिल्ली, 23 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज संविधान बचाव अभियानाचं उद्घाटन केलं. नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मोदींविरोधात तोफ डागली. या कार्यक्रमाला डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'एनडीए सरकार दलितविरोधी आहे. मोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही. सरकार सुप्रीम कोर्टावर दबाव आणतंय. न्यायसंस्थांना कमी लेखलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ स्वत:मध्येच रस आहे.'

राहुल गांधी म्हणाले, संसदेत बोलायला मोदी घाबरतात. खासदारांना सरकारकडून शांत केलं जातंय.

बलात्काराच्या घटनांबद्दल राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नवी घोषणा देतील, मुलगी वाचवा, भाजपच्या लोकांपासून वाचवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...