'काँग्रेस माझ्या रक्तात आहे, नेहमीच राहील,' राहुल गांधींचं भावूक राजीनामापत्र

'काँग्रेस माझ्या रक्तात आहे, नेहमीच राहील,' राहुल गांधींचं भावूक राजीनामापत्र

राहुल गांधींचा राजीनामा आणि काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीवरून बुधवारी अनेक टि्वस्ट पाहायला मिळाले. राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये या मागणीवर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ठाम होते तर राहुल गांधी राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर राहुल गांधींनी आपला राजीनामा सादर केला आणि त्यांनी तो ट्विटरवरही पोस्ट केला आहे. मी आता फक्त खासदार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या राजीनामापत्रातला हा काही भाग....

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जुलै : राहुल गांधींचा राजीनामा आणि काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीवरून बुधवारी अनेक टि्वस्ट पाहायला मिळाले. राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये या मागणीवर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ठाम होते तर राहुल गांधी राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर राहुल गांधींनी आपला राजीनामा सादर केला आणि त्यांनी तो ट्विटरवरही पोस्ट केला आहे. मी आता फक्त खासदार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या राजीनामापत्रातला हा काही भाग....

राहुल गांधी म्हणतात...

माझ्यासाठी काँग्रेसची सेवा करणं ही सन्मानाची बाब होती. मी देशवासियांकडून आणि पक्षाकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल अत्यंत आभारी आहे.

काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला मी जबाबदार आहे. त्यामुळेच मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.काँग्रेस पक्षाचं पुन्हा एकदा संघटन करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मी जर माझ्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांना या पराभवासाठी जबाबदार ठरवलं तर ते अन्यायकारक ठरेल.

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची मी नियुक्ती करावी, अशी सूचना माझ्या सहकाऱ्यांनी केली आहे. पण त्या व्यक्तीची निवड मी करणं उचित होणार नाही.

'त्यांना मतभेद दिसतात तिथे मला समानता दिसते'

भाजपबदद्ल माझ्या मनात कोणताही द्वेष किंवा राग नाही. पण माझ्या शरीरातल्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वाभाविकरित्या भाजपच्या विचारांना विरोध करतो. ही काही नवी लढाई नाही. या भूमीवर हजारो वर्षांपासून ही लढाई होत आली आहे. जिथे त्यांना मतभेद दिसतात तिथे मला समानता दिसते. जिथे त्यांना घृणा दिसते तिथे मला प्रेम दिसून येतं. ज्याची त्यांनी भीती वाटते त्याला मी अलिंगन देतो.

आपला देश आणि देशाच्या घटनेचं संरक्षण करण्यासाठी मी कायमच लढत राहीन. मी काँग्रेसचा एक निष्ठावान शिपाई आणि भारताला समर्पित झालेला पुत्र आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी देशाची सेवा करत राहीन.

'एकट्याने संघर्ष केला'

आमचं अभियान हे भारतीय नागरिक, सगळ्या धर्मांचा सलोखा, सहिष्णुता आणि सन्मानासाठी आहे. मी हा संघर्ष केला कारण माझं भारतावर प्रेम आहे.अनेक वेळा मला एकट्याने या संघर्षात उभं राहावं लागलं पण याचा मला अभिमानच आहे. मी माझ्या पक्षातल्या सदस्यांच्या समर्पणाच्या भावनेतून बरंच काही शिकलो आहे.

मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत

देशात सगळ्याच लोकशाही संस्थांच्या वस्तुनिष्ठतेसाठी स्वतंत्र आणि नि:पक्ष निवडणुका गरजेच्या आहेत. जर आर्थिक संस्थांवर एखाद्या पक्षाचं नियंत्रण असेल तर निवडणुका नि:पक्षपातीपणे होणार नाहीत.

सत्तेवर अशा तऱ्हेचा कब्जा भारताचं नुकसान करणारा ठरणार आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याक यांचं नुकसान होण्याचा धोका आहे.

याचा अर्थव्यवस्था आणि भारताच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

'सत्याचा प्रकाश लपवता येत नाही'

पंतप्रधान हे त्यांच्या विजयामागे त्यांच्यावर लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप दडवू शकत नाहीत. पैसे आणि प्रपोगंडाच्या जोरावर सत्याचा प्रकाश लपवता येत नाही. भारताच्या लोकशाही संस्थांना पुनरुज्जीवन द्यायचं असेल तर भारतीयांना एकत्र यावं लागेल. काँग्रेस पक्षानेही यासाठी स्वत:ला बदलण्याची गरज आहे. मला अनेक भारतीयांनी पाठिंब्याची पत्रं पाठवली त्याबदद्ल सगळ्या भारतीयांचे मी आभार मानतो. मी काँग्रेसचे विचार आणि आदर्शांसाठी लढत राहीन.

मी जन्माने काँग्रेसी आहे. काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि नेहमीच राहील.

========================================================================================================

VIDEO : पुण्यातले रँचो! 55 दिवसांत बनवली 'बॅटमॅन' कार

First published: July 3, 2019, 8:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading