INSIDE STORY : राहुल गांधींच्या राजीनामा नाट्यामागे आहे 'हा' मोठा प्लॅन

INSIDE STORY : राहुल गांधींच्या राजीनामा नाट्यामागे आहे 'हा' मोठा प्लॅन

राहुल यांनी पक्षाला नवा अध्यक्ष शोधण्यासाठी आणि नेमणुकीसाठी एक महिन्याची मुदत द्यायची तयारी दर्शवली आहे. पण ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं

  • Share this:

नवी दिल्ली, 28 मे :  लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाल्यानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस कार्यकारिणीने राहुल यांनी राजीनामा देऊ नये यासाठी त्यांना विनंती केली आहे आणि राजीनाम्याच्या बातम्या खोट्या असल्याचंही माध्यमांना सांगितलं आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी पक्षाध्यक्षपद राहुल यांच्याकडेच असल्याचं जाहीर केलं. पण सध्या तरी राहुल आपला निर्णय बदलण्याच्या तयारीत नाहीत. संध्याकाळी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते यासंदर्भात पुन्हा प्रस्ताव द्यायची शक्यता आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल यांनी पक्षाला नवा अध्यक्ष शोधण्यासाठी आणि नेमणुकीसाठी एक महिन्याची मुदत द्यायची तयारी दर्शवली आहे. पण ते राजीनामा देऊन देशाच्या दौऱ्यावर जाणार आहे.

राहुल यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर प्रियांका गांधी यांच्या नावाचाही अध्यक्षपदासाठी विचार झाला. पण तो मान्य करण्यात आलेला नाही. राहुल, प्रियांका यांनीच तो प्रस्ताव नाकारला आहे.

पराभवानंतर काँग्रेसचं आत्मचिंतन सुरू आहे. काँग्रेस कार्यकारिणीची दुसरी बैठक या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नव्या अध्यक्षासंदर्भात विचार होऊ शकतो. याच बैठकीत राहुल गांधी राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पहिल्या बैठकीत राहुल यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर यूपीए अध्यक्षस्थानी असणाऱ्या सोनिया गांधींनीच त्यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळला होता.

बारावीचे निकाल जाहीर; इथे क्लिक करून पाहा थेट निकाल

पहिल्या बैठकीत राहुल आणि प्रियांका यांनी काही ज्येष्ठ नेत्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली होती. आपापल्या मुलांसाठी एकाच मतदारसंघात अडकल्याबद्दल राहुल यांनी कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांना सुनावलं होतं

असा आहे प्लॅन

राहुल यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधी धडा शिकवायचं ठरवलं आहे. त्यासाठीच त्यांना अध्यक्षपदावर राहायचं नाही. गांधी परिवारातलं कुणीच अध्यक्षपदावर राहू नये, अशी त्यांची इच्छा आहे, कारण तेव्हाच गांधी परिवाराचं पक्षातलं नेतृत्व इतरांच्या लक्षात येईल. या विचारामागे इतिहास आहे.

राहुल गांधींचा राजीनामा देण्याचा निर्णय, रजनीकांत म्हणाले...

ममतांना धक्का, 50 नगरसेवकांसह 4 आमदार भाजपमध्ये जाणार?

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस परिवारातलं कोणी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा घेऊ नये, यासाठी काही तत्कालीन ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले होते. काँग्रेसची अवस्था बिकट झाल्यानंतर 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी सीताराम केसरींना हटवून स्वतः काँग्रेसची सूत्र हाती घेतली. तेव्हापासून पुन्हा एकदा काँग्रेसवर गांधी परिवाराची पकड घट्ट आहे.

पण अर्थातच त्या वेळचा काळ वेगळा होता. तेव्हा काँग्रेसच्या पुढची आव्हानं वेगळी होती. आता काँग्रेससमोर असलेला प्रतिस्पर्धी खूपच ताकदवान झाला आहे. त्याच्याशी लढा देताना इतिहासातली ही खेळी किती उपयोगी पडणार हे लवकरच कळेल.

SPECIAL REPORT : विधानसभेवर झेंडा युतीचाच! कुणाच्या जागा आहेत धोक्यात?

First published: May 28, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading