आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच नवीन संकल्पना मांडण्यासाठी राजकारण्यांकडून सोशल मीडियाचा वापर केला जातो. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब हे त्यासाठी प्रभावी व्यासपीठ समजलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. मात्र आता नरेंद्र मोदी यांनीच सोशल मीडिया सोडण्याचा विचार केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.Give up hatred, not social media accounts. pic.twitter.com/HDymHw2VrB
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 2, 2020
दरम्यान, नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकीय नेते आहेत. इंस्टाग्रामवर 3 कोटी 52 लाख, ट्विटरवर 5 कोटी 33 लाख आणि फेसबुकवर 4 कोटी 45 लाख लोक मोदींना फॉलो करतात, तर नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला 45 लाख सबस्क्राईबर आहेत. दुसरीकडे, राहुल गांधीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे ट्विटवरवर 12.1 मिलियन फॉलोअर्स तर फेसबुकवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. फोटोसाठी लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवरही राहुल गांधींचे अकाउंट आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 9 लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर राहुल गांधींच्या नावाने चॅनेल आहे. या चॅनेलचेही 1 लाख 68 हजार सबस्क्रायबर्स आहेत.This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra Modi (Politician), Rahul Gandhi (Politician), Social media