सोमनाथ मंदिराच्या रजिस्टरमध्ये राहुल गांधींची गैरहिंदू नोंद ! राजीव सातव यांनी आरोप फेटाळले

सोमनाथ मंदिराच्या रजिस्टरमध्ये राहुल गांधींची गैरहिंदू नोंद ! राजीव सातव यांनी आरोप फेटाळले

आज राहुल गांधी सोमनाथच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सोमनाथाचं दर्शन घेऊन पूजाही केली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांचा नोंद ही हिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली तर राहुल गांधी आणि आणि अहमद पटेल यांच्या नावाची नोंद गैरहिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे.

  • Share this:

सोमनाथ, 29 नोव्हेंबर:  गुजरात निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी वादात सापडले आहेत. गुजरात प्रचारादरम्यान राहुलनी सोमनाथच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पण यावेळी त्यांची नोंद गैर हिंदू  रजिस्टरमध्ये केली असल्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

आज राहुल गांधी सोमनाथच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सोमनाथाचं दर्शन घेऊन पूजाही केली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांचा नोंद ही हिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली तर राहुल गांधी आणि  आणि अहमद पटेल यांच्या नावाची नोंद गैरहिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. सोमनाथ मंदिरात येणाऱ्या गैरहिंदूंच्या नावाची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये केली जाते. त्यानुसार, काँग्रेसच्या मीडिया प्रभारींनी राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्या नावाची नोंद गैरहिंदू रजिस्टरमध्ये केली आहे.

दरम्यान, हा सर्व वाद निरर्थक असून, भाजपनेच हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हा वाद निर्माण केल्याचं काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधीचे निकटवर्तीय राजीव सातव यांनी म्हटलंय. राहुल गांधींनी मंदिराच्या व्हिजीटर्स बूकमध्ये या मंदिराचा उल्लेख प्रेरणास्थळ म्हणून केल्याचंही सातव यांनी स्पष्ट केलंय.

गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत आहेत. काही दिवसांपूर्वी ते अक्षरधामलाही गेले होते. तसंच गुजरातची रणधुमाळीही प्रचंड गाजतं असून 18 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 05:45 PM IST

ताज्या बातम्या