'माझा निर्णय झाला आहे!' राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

'माझा निर्णय झाला आहे!' राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्याच्याच मन: स्थितीत आहेत. त्यांनी राजीनामा देऊ नये अशी पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे पण राहुल गांधी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

  • Share this:

पल्लवी घोष

नवी दिल्ली, 26 जून : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्याच्याच मन: स्थितीत आहेत. त्यांनी राजीनामा देऊ नये अशी पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे पण राहुल गांधी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

काँग्रेस नेत्यांची बैठक

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक बोलावली होती. यामध्ये मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला पुन्हा धक्का? पुरस्कृत खासदार भाजपच्या वाटेवर

काँग्रेस नेते शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदी राहून काँग्रेसचं नेतृत्व सुरू ठेवण्याची विनंती केली. पराभवाची जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकून चालणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता माझा निर्णय झाला आहे आणि मी त्यावर ठाम आहे, असं राहुल गांधींनी त्यांना सांगितलं, अशी सूत्रांची माहिती आहे.

निवडणुकीबद्दल नेत्यांशी चर्चा

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आता विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी राहुल गांधींनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती.त्यामुळे राहुल गांधी अध्यक्षपदी कायम राहणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत,असंच दिसतं.

आधी नाकारला राजीनामा

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर 25 मे ला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये राहुल गांधींनी राजीनामा देऊ केला होता. त्यावेळेस कार्यकारिणीने एकमताने त्यांचा राजीनामा नाकारला. राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहतील,असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितलं होतं.

मणिशंकर अय्यर यांचं विधान

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी नुकतंच राहुल गांधींबदद्ल एक विधान केलं होतं. राहुल गांधीच जर अध्यक्षपदी राहिले तर पक्षासाठी ते चांगलं आहे पण त्यांच्या इच्छेचाही आदर केला जाईल, असं ते म्हणाले होते. आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वाबदद्ल काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

=================================================================================================

VIDEO: ...आणि चिमुकलीनं दिली विठुरायाची शपथ

First published: June 26, 2019, 2:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading