राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

केंद्रीय निवडणूक आयोगानेही या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी झारखंड विधानसभा निवडणूक प्रचारात केलेलं एक वक्तव्य वादात सापडलं आहे. देशातील बलात्काराच्या वाढणाऱ्या घटनांवर सरकारला लक्ष्य करताना राहुल गांधी यांनी देशात मेक इन इंडिया नाही तर रेप इन इंडिया सुरू आहे, असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगानेही या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

राहुल गांधी यांनी 12 डिसेंबर रोजी गोड्डा येथे एका सभेत बलात्काराच्या घटनांबाबत केलेल्या टीकेबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तक्रार केली. या तक्रारीवर भारतीय निवडणूक आयोगाने झारखंडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात राहुल गांधी यांच्या अडचणी वाढतात की याच मुद्द्यावरून ते सरकारला कोंडीत पकडतात हे पाहावं लागले.

काय आहे प्रकरण?

देशभरात सध्या बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याच मुद्द्यावरून आक्रमक होत महिला सुरक्षेवरून राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरलं. पंतप्रधान मोदी यांनी तर मेक इन इंडियाची घोषणा केली होती. मात्र सध्या रेप इन इंडिया सुरू आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर लोकसभेत मोठा गदारोळ झाला.

भाजपच्या खासदारांनी राहुल गांधी यांनी भारतीय महिलांची माफी मागावी असे मागणी केली होती. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना, "मोदी आणि शाह अर्थव्यवस्थेच्या दुरावस्थेबाबत बोलणे टाळण्यासाठी हा मुद्दा उचलून धरत आहेत. मी माफी मागणार नाही. माफी मोदींनी देशाची मागावी. त्यांच्यामुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे”, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा 2014चा एक व्हिडीओ ट्वीट केला.

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या या 2014च्या व्हिडीओमध्ये मोदींनी 'दिल्लीला ही बलात्काराची राजधानी आहे' असे संबोधले होते. त्यामुळं राहुल गांधी यांनी माफी न मागण्याचा निर्णय घेताच, मोदींवर पलटवार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 10:39 AM IST

ताज्या बातम्या