पंतप्रधान! आता तरी बोला-उन्नाव, कठुआ प्रकरणी राहुल गांधींचं आवाहन!

पंतप्रधान! आता तरी बोला-उन्नाव, कठुआ प्रकरणी  राहुल गांधींचं आवाहन!

वाढत्या बलात्कारांच्या घटनांविरूद्ध काल रात्री राहुल गांधी कॅण़्डल मार्च काढला होता. आता आज मात्र त्यांनी मोदींनी याप्रकरणी पाळलेल्या मौनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय

  • Share this:

13  एप्रिल:  गेले दोन दिवसात कठुआ आणि उन्नाव इथे झालेल्या बलात्कारांवर संतप्त प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहेत.  आता या साऱ्यात राजकारण्यांनी उडी  घेतली आहे. मनेका गांधी, स्मृती इराणी,मेहबुबा मुफ्ती यांच्या पाठोपाठ आता  राहुल गांधीने ट्विट केलं आहे.

वाढत्या बलात्कारांच्या घटनांविरूद्ध काल रात्री राहुल गांधी  कॅण़्डल मार्च काढला होता. आता आज मात्र त्यांनी  मोदींनी याप्रकरणी पाळलेल्या मौनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. महिलांविरूद्ध होणाऱ्या अत्याचाराबद्दल आपल्याला काय वाटतं?  असा प्रश्न त्यांनी विचारलाय. तसंच आरोपींना तुम्ही पाठीशी का घालताय  असंही विचारलंय. यावर त्यांनी बोलाव असं आव्हान त्यांनी आपल्या ट्विटच्या शेवटी केलं आहे.

काल भाजपच्या एका वाचाळ नेत्याने यातही पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला होता. तर स्मृती इराणी सगळ्यांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलंय . याप्रकरणी लवकरच शिक्षा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

आता याप्रकरणी शिक्षा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 06:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading