गुजरातमध्ये आम्हीच जिंकणार -राहुल गांधी

गुजरातच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आज अंतिम दिवस आहे. मोदीही आज सी प्लेनमधून प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका केली.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2017 02:06 PM IST

गुजरातमध्ये आम्हीच जिंकणार -राहुल गांधी

12 डिसेंबर: गुजरातमध्ये आम्हीच जिंकणार असा आशावाद आज राहुल गांधींनी गुजरातमध्ये व्यक्त केला आहे ते अहमदाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

गुजरातच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आज अंतिम दिवस आहे.  मोदीही आज सी प्लेनमधून प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका केली. 22 वर्षात गुजरातमध्ये फक्त मोदी  आणि रूपाणी सारख्यांचंच भलं झालं. निवडक लोकांचाच विकास झाला.  असं म्हणत गुजरात विकास मॉडेलवर त्यांनी ताशेरे ओढले. तसंच शैक्षणिक संस्थांच्या खाजगीकरणावर टीका  करण्यात आली. या सगळ्यात त्यांच्या मंदिर प्रवेशाचा विषयावरही ते बोलले. 'मी आधीपासूनच मंदिरात जातो' असं उत्तरही त्यांनी विरोधकांना दिलं. तसंच युवकांच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं.

आज गुजरातच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी  राहुल गांधींनी जगन्नाथाचं दर्शन घेतलं तर पंतप्रधान  मोदींनी  अंबिका मातेचं दर्शन घेतलं. दोन्ही  पक्षांच्या अजूनही अनेक  नेत्यांनी मंदिरांमध्ये जाऊन दर्शनं घेतली आहेत.त्यामुळे गुजरातमधील राजकारणात अजूनही श्रद्धेच महत्त्व कमी झालेलं नाही असं दिसतंय.

गुजरातची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 14 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. तसंच 18 तारखेला निकाल आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये खरच काँग्रेस जिंकतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...