मराठी बातम्या /बातम्या /देश /Rahul Gandhi : PM मोदींच्या डोळ्यात भीती दिसली, ते माझ्या भाषणाला घाबरले : राहुल गांधी

Rahul Gandhi : PM मोदींच्या डोळ्यात भीती दिसली, ते माझ्या भाषणाला घाबरले : राहुल गांधी

mp rahul gandhi

mp rahul gandhi

Rahul Gandhi : मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. यानंतर राहुल गांधी हे पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्ली, 25 मार्च : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केलं. राहुल गांधी यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

देशात लोकशाहीवर आक्रमण होत असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी आपल्यावर झालेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं. ससंदेत माझ्यावर खोटे आरोप झाले. माझी खासदारकी रद्द करून मला गप्प बसवू शकत नाहीत. मी लोकशाहीसाठी लढतोय आणि लढत राहणार. मला कुणीही घाबरवू शकत नाही असं राहुल गांधी म्हणाले.

'तेव्हा' माफी मागितली असती तर आज.., राहुल गांधी प्रकरणात राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! 

संसदेत मी पुरावे दिले आणि फोटोही दाखवले. संसदेत मंत्र्यांनी माझ्याबाबत खोटं सांगितलं. मोदींच्या डोळ्यात मी भीती पाहिली. संसदेतील माझ्या भाषणाला ते घाबरले म्हणून माझी खासदारकी रद्द केली असंही राहुल गांधी म्हणाले.

मी लोकसभा अध्यक्षांना पत्रे लिहून सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. वक्तव्यांबाबत आणि त्याच्या संदर्भात मी सर्व काही सांगितलं आहे. मुद्दा भरकटवण्यासाठी आणि प्रश्नांपासून पळण्यासाठी खासदारकी रद्द करण्याचा घाट घालण्यात आल्याचं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर घणाघात केला.

First published:
top videos

    Tags: Rahul gandhi