S M L
Football World Cup 2018

काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना सुरूवात

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावं, असा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसकडून अध्यक्ष संजय निरूपम मांडला.

Sachin Salve | Updated On: Oct 11, 2017 10:46 PM IST

काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना सुरूवात

11 आॅक्टोबर : राहुल गांधी यांचा काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावर्षीच्या अखेरपर्यंत राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालीय. राज्य काँग्रेस कमिटी त्यासाठीचा ठराव मंजूर करतायत. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावं, असा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसकडून अध्यक्ष संजय निरूपम मांडला. या ठरावाला सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, नसीम खान, रजनी पाटील, एकनाथ गायकवाड कृपाशंकर सिंह, विश्वजीत कदम विलास मुत्तेमवार, वसंत पुरके यांनी अनुमोदन दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या सर्व नवनियुक्त प्रतिनिधींनी एकमतानं हा ठराव मंजूर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 07:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close