काँग्रेस आता फ्रंटफुटवर खेळणार, नरेंद्र मोदी चोरच - राहुल गांधी

नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात 30 हजार कोटी रुपये लुटले असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 06:15 PM IST

काँग्रेस आता फ्रंटफुटवर खेळणार, नरेंद्र मोदी चोरच - राहुल गांधी

लखनऊ 11 फेब्रुवारी : लखनऊत जोषात झालेल्या रोड शो नंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलीय. प्रत्येक राज्यात काँग्रेस आता फ्रंटफूटवर खेळणार आहे. भाजपच्या विचारधारेला काँग्रेस हरवणार आहे, पक्ष बॅकफूटवर खेळणार नाही असंही त्यांनी सांगितलं. स्थानिक नेत्यांना प्राधान्य देणं ही तुमची जबाबदारी  आहे अशी सूचनाही त्यांनी प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना केली.


नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात 30 हजार कोटी रुपये लुटले असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. चौकिदार चौर है असंही ते म्हणाले. मोदींचा पोकळपणा आता उघड झाला आहे.काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशचा कायापालट करण्यासाठी लढणार असंही ते म्हणाले.


लखनऊतल्या शक्ती प्रदर्शनाच्या आधी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक भावुक पोस्ट करत प्रियांकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची सेवा करणं हे प्रियांकाचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत असं रॉबर्ट वाड्रा यांनी लिहिलं आहे.

Loading...


त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, " उत्तर प्रदेशातल्या नव्या प्रवासाबद्दल आणि भारतीयांच्या सेवेसाठी प्रियांकांना शुभेच्छा. तु माझी चांगली मित्र आणि पत्नी आहेस. आपल्या मुलांची उत्तम आई आहेस. सध्या व्देषाचं आणि कलुषीत राजकीय वातावरण आहे.


मात्र मला माहित आहे की लोकांची सेवा करणं हे तीचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे तीला लोकांच्या हवाली करत आहेत." आता तुम्हीच तीचं रक्षण करा असं आवाहनही त्यांनी लोकांना केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...