Air Strike नंतर काय म्हणाले राहुल गांधी?

Air Strike नंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 09:53 AM IST

Air Strike नंतर काय म्हणाले राहुल गांधी?

दिल्ली, 26 फेब्रुवारी : भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तब्बल 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं 1 हजार किलोचा बॉम्ब दहशतवाद्यांच्या तळावर फेकला. दरम्यान, या हल्ल्यानंतर काँग्रेसचे अध्ययक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलानं केलेल्या कामगिरीवर 'भारतीय वायु दलाच्या पायलटांना माझा सलाम' असं ट्विट केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देखील राहुल गांधी यांनी कोणतंही राजकारण न करता आम्ही सरकारच्या पाठिशी ठाम उभे असल्याचं म्हटलं होतं.



Loading...

200 ते 300 दहशतवादी ठार

बालाकोट या पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आता सुत्रांनी दिली आहे. 12 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

Air strikeचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे, दरम्यान बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली आहे. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना मापाी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.


शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वीरपत्नीनं घेतला 'हा' निर्णय


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...