पक्षापेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व; कमलनाथ, गहलोत यांच्यावर राहुल यांचे गंभीर आरोप!

पक्षापेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व; कमलनाथ, गहलोत यांच्यावर राहुल यांचे गंभीर आरोप!

राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. पराभवाची जबाबदरी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली. पण, CWCनं त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. CWCच्या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर गंभीर आरोप केले. या दोन्ही नेत्यांनी पक्ष हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिलं अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. बैठकीदरम्यान राहुल गांधी रागावलेले होते असं देखील टाईम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.

सत्ता असूनही जनाधार नाही

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. त्यानंतर देखील काँग्रेसला अपेक्षित असं यश या दोन्ही राज्यांमध्ये मिळालं नाही. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांना विजयी करण्यावर जास्त लक्ष केंद्रीत केलं. स्थानिक नेतृत्व तयार करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचं त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विधानाचा हवाला देत केलं. बैठकीदरम्यान पी. चिदंबरम यांचं नाव देखील राहुल गांधी यांनी घेतलं. स्थानिक नेतृत्वाला पुढे आणण्यामध्ये काँग्रेस अपयशी ठरल्यावर देखील राहुल गांधी नाराजी व्यक्त केली.

पराभवाची जबाबदारी स्वीकारली

राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. शिवाय, गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष नेमावं असं देखील राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यास दक्षिण भारतात काँग्रेसला त्याचा फटका बसेल असं पी. चिदंबरम यांनी म्हटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

SPECIAL REPORT: पुणेकराची झोपमोड करणाऱ्या कोंबड्याला अटक होणार?

First published: May 26, 2019, 10:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading