दिवाळीनंतर काँग्रेस पक्षाची धुरा राहुल गांधींकडे?

मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 4, 2017 11:28 AM IST

दिवाळीनंतर काँग्रेस पक्षाची धुरा राहुल गांधींकडे?

04 ऑक्टोबर: दिवाळीनंतर कांग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहूल गांधींची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.

सध्या सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.   राहुल गांधीनी पक्षाची धुरा स्वीकारावी अशी सोनिया गांधीची इच्छा असल्याचं सर्वश्रुत आहे. त्यातच गेले वर्षभर पक्षाचे सगळे महत्त्वाचे निर्णय राहूल गांधी घेत आहेत. गेले तीन वर्ष मोदींविरूद्ध काँग्रेसचा चेहरा म्हणून राहूल गांधीxना प्रोजेक्ट करण्यात येतं आहे. तसंच अध्यक्षपदासाठी अजून कुणी उभं राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे राहूल गांधी बिनविरोध काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले जाण्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसात राहूल गांधींच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. त्यांच्या ट्विटर फोलोअर्समध्ये 10 लाखांनी वाढ झाली आहे.

राहुल गांधी दिवाळीनंतर  पक्षाध्यक्ष होण्याचे संकेत राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. अध्यक्ष झाल्यास गुजरात,हिमाचल,कर्नाटक या राज्यांच्या निवडणुकांची धुरा राहुल गांधींच्या हाती येऊ शकते.

त्यामुळे आता खरोखर राहुल गांधींच्या हाती पक्षाची धुरा पडते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 11:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close